SBC Exports Share:- शेअर बाजारात मंगळवारी चांगली तेजी पाहायला मिळाली. 2025 च्या अर्थसंकल्पानंतर सोमवारी काहीशी घसरण झाली होती. मात्र आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात अनेक शेअर्सने दिलासा देणारी तेजी दाखवली.ज्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे.
विशेषतः स्मॉलकॅप कंपनी एसबीसी एक्सपोर्ट्सच्या शेअर्समध्ये 8% पर्यंत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. यामागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडावर लादलेले शुल्क हटवल्याची घोषणा असल्याचे सांगितले जात आहे.
एसबीसी एक्सपोर्ट्सचे शेअर्स 8% वधारले
मंगळवारी एसबीसी एक्सपोर्ट्सचे शेअर्स 21.20 रुपयांच्या पातळीवर उघडले तर इंट्राडे दरम्यान त्यांनी 22.66 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. हे सोमवारीच्या 20.97 रुपयांच्या बंद किमतीपेक्षा 8% वाढ दर्शवते. मात्र ही तेजी कायम राहू शकली नाही आणि दुपारी 12.10 वाजता हा शेअर किंचित घसरून 20.91 रुपयांवर व्यवहार करत होता.
गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर संधी
आजच्या वाढीपूर्वी गेल्या तीन सत्रांपासून या पेनी शेअरमध्ये सातत्याने घसरण होत होती. मागील वर्षभरात विक्रीचा दबाव जाणवत होता. विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरात हा शेअर 22% नी घसरला असून सहा महिन्यांच्या कालावधीतही मोठा तोटा नोंदवण्यात आला आहे.
एक वर्षाच्या कालावधीत 13% घसरण झाली असली तरी पाच वर्षांच्या कालावधीत या शेअरने 175% पेक्षा अधिक परतावा दिला आहे. जो दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी अत्यंत फायदेशीर ठरला आहे.
कंपनीकडून बोनस शेअर्सची मोठी घोषणा
नुकतेच एसबीसी एक्सपोर्ट्सने आपल्या भागधारकांसाठी 1:2 प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांकडे असलेल्या प्रत्येक दोन शेअर्समागे एक अतिरिक्त शेअर विनामूल्य दिला जाणार आहे.
मात्र बोनस शेअर्ससाठी पात्र भागधारकांची ओळख पटविण्यासाठी अद्याप रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आलेली नाही.जी लवकरच घोषित केली जाईल.
गुंतवणुकीसाठी चांगली संधी?
एसबीसी एक्सपोर्ट्ससारख्या स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये जोखीम असली तरी योग्य वेळी गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळू शकतो. कंपनीने नुकत्याच घोषित केलेल्या बोनस शेअर्समुळे गुंतवणूकदारांना अधिक फायदा होऊ शकतो. भविष्यातील वाढीच्या शक्यतांचा विचार करता गुंतवणूकदारांनी या शेअरवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.