SBI Account:- प्रत्येकाचे आता बँकेमध्ये खाते असते. केंद्र सरकारच्या जनधन योजनेअंतर्गत आता देशातील कोट्यावधी लोकांनी बँकेत खाते उघडले असून त्यामुळे आता अनेक सर्वसामान्य लोकांचा देखील बँकेशी संबंध येऊ लागला असून बँकिंग व्यवहारांबद्दल चे ज्ञान वाढले आहे. भारतातील बँकांचा दृष्टिकोनातून विचार केला तर स्टेट बँक ऑफ इंडिया एक महत्त्वाची बँक असून सर्वात जास्त ग्राहक या बँकेचे आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया नेहमीच ग्राहकांच्या हितासाठी अलर्ट असते व त्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण असे फायद्याचे निर्णय देखील घेत असते. याच अनुषंगाने जर आपण स्टेट बँकेमध्ये उघडण्यात येऊ शकतील अशा प्रकारच्या बचत खात्यांचा विचार केला तर यामध्ये तब्बल पाच प्रकारची बचत खाते ग्राहक उघडू शकतात.

प्रकारामध्ये वेगवेगळे नियम असून ते ग्राहकाला माहीत असणे देखील तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे आपण या लेखात स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये कोणकोणत्या प्रकारचे खाते उघडता येतात व त्यांचे नियम काय आहेत? याबद्दलचे महत्त्वाची माहिती घेऊ.
स्टेट बँकेमध्ये उघडता येतील असे बचत खात्यांचे प्रकार
1- बेसिक सेविंग अकाउंट – या प्रकारचे खाते कोणताही भारतीय नागरिक वैयक्तिक किंवा संयुक्तरित्या उघडू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे झिरो बॅलन्स वर हे खाते उघडता येणे शक्य आहे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला महिन्याकाठी कमीत कमी म्हणजेच मिनिमम बॅलन्स ठेवण्याची देखील आवश्यकता नाही.
बचत खात्याप्रमाणे पैसा जमा करणे, एटीएम मधून रोख रक्कम काढणे तसेच फंड ट्रान्सफर इत्यादी सुविधांचा लाभ या खात्याच्या माध्यमातून मिळतात. समजा तुमचे खाते इन ऍक्टिव्ह म्हणजेच निष्क्रिय असले तरी देखील कुठल्याही प्रकारचे शुल्क तुम्हाला आकारले जात नाही.
2- एसबीआय स्मॉल सेविंग अकाउंट– हे खाते तुम्ही सिंगल किंवा जॉईंट या दोन्ही पद्धतीने उघडू शकतात. खाते उघडून झाल्यानंतर तुम्हाला 24 महिन्याच्या आत केवायसी करणे बंधनकारक आहे. या प्रकारच्या खात्यामध्ये देखील तुम्हाला कमीत कमी बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही. तुम्ही या स्मॉल अकाउंटचे रूपांतर रेगुलर सेविंग अकाउंट बीएसबीडीएमध्ये करू शकतात व तुम्हाला पैसे काढायचे असेल तर तुम्ही या खात्याच्या माध्यमातून एका महिन्यात दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे या खात्यामधून काढू शकत नाहीत.
3- एसबीआय रेग्युलर सेविंग अकाउंट म्हणजेच नियमित बचत खाते– या खात्यामध्ये एक कोटी रुपयांपर्यंतची शिल्लक असेल तर त्या रकमेवर साडेतीन टक्के दराने व्याज मिळते. यामध्ये कमीत कमी समतोल राखणे गरजेचे आहे. या प्रकारच्या खात्यामध्ये तुम्हाला नॉमिनेशन सुविधा, लॉकर सुविधा तसेच इ स्टेटमेंट सुविधा, एसएमएस अलर्ट चे सुविधा देण्यात आली आहे व तसेच यासोबत अनेक महत्त्वाच्या सुविधा देखील उपलब्ध आहेत.
4- एसबीआय डिजिटल बचत खाते– या प्रकारचे खाते तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या योनो ॲपच्या माध्यमातून घडू शकतात. परंतु या प्रकारच्या खात्यामध्ये तुम्हाला संयुक्त म्हणजे जॉइंट अकाउंट उघडता येते. या प्रकारच्या खाते उघडणाऱ्या खातेदाराला दहा पाणी चेक बुक देण्यात येते व डेबिट कार्ड देखील बँकेकडून मोफत दिले जाते व अनेक सुविधा मिळतात.
5- अल्पवयीन मुलांसाठी एसबीआय बचत खाते– लहान मुलांना फायदा होईल किंवा सुविधा निर्माण होईल या दृष्टिकोनातून स्टेट बँक ऑफ इंडियाने दोन प्रकारची खाते उघडण्याची सुविधा अल्पवयीन मुलांसाठी उपलब्ध करून दिली असून यातील पहिली पायरी आणि पहिली फ्लाईट खाते उघडली जातात. यामध्ये पहिली पायरी म्हणजे कोणत्याही मुलांसाठी खाते उघडण्याची सुविधा दिली जाते
तसेच तुम्ही इच्छित असल्यास पालक किंवा पालकांसह संयुक्त अथवा जॉईंट खाते उघडू शकतात. तसेच फ्लाईट अकाउंट या दुसऱ्या प्रकाराचा विचार केला तर या माध्यमातून तुम्ही दहा वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलाकरिता सिंगल बेसिस वरती उघडू शकतात. अल्पवयीन मुलांसाठी असलेल्या या खात्यांमध्ये मिनिमम मंथली बॅलन्स असण्याची आवश्यकता नाही. तसेच नियमित बचत खात्यावर जो काही व्याजदर आहेत तो व्याजदर आणि सुविधा या खात्यांमध्ये देखील मिळतो.