SBI ATM Franchise: दरमहा 90 हजार रुपये कमावण्याची सुवर्णसंधी ! फक्त करा ‘हे’ काम अन् व्हा मालामाल

Published on -

SBI ATM Franchise: तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन व्यवसाय सुरु करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फार महत्वाची ठरणार आहे.

आम्ही तुम्हाला आज या लेखात एका भन्नाट व्यवसायबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही दरमहा घरी बसून 90 हजार रुपये सहज कमवू शकतात. मात्र हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला एकदा 5 लाख रुपये गुंतवावे लागणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्हाला ही गुंतवणूक SBI ATM फ्रँचायझीमध्ये करावी लागणार आहे. चला मग जाणून घेऊया या भन्नाट व्यवसायबद्दल संपूर्ण माहिती.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या कंत्राटी पद्धतीने SBI ने एटीएम लावण्यासाठी टाटा इंडिकॅश, मुथूट एटीएम आणि इंडिया वन एटीएमसोबत करार केला आहे.याचा फायदा घेत तुम्ही दरमहा आरामात 90 हजार रुपये कमवू शकतात.

एसबीआय एटीएम फ्रँचायझी आवश्यकता

एटीएम सेट करण्यासाठी तुमच्याकडे 50-80 स्क्वेअर फूट जागा असणे आवश्यक आहे. दुसऱ्या एटीएमपासून त्याचे अंतर 100 मीटर असावे. हे ठिकाण लोकांना सहज दिसेल अशा ठिकाणी असावे. 24 तास वीजपुरवठा असावा, याशिवाय 1 किलोवॅट वीज जोडणीही आवश्यक आहे. या एटीएमची क्षमता दररोज 300 व्यवहारांची असावी. एटीएमला काँक्रीटचे छत असावे. V-SAT लागू करण्यासाठी सोसायटी किंवा प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.

SBI ATM फ्रँचायझीसाठी अर्ज कसा करावा

देशात एटीएम फ्रँचायझी लावण्याचा करार केवळ टाटा इंडिकॅश, मुथूट एटीएम आणि इंडिया वन एटीएमशी आहे. अशा परिस्थितीत एसबीआय एटीएमची फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्हाला या कंपन्यांकडे अर्ज करावा लागेल. तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकता.

एसबीआय एटीएम फ्रँचायझीसाठी आवश्यक कागदपत्रे

ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार कार्ड आणि पत्त्याच्या पुराव्यामध्ये रेशनकार्ड, वीज बिल याशिवाय बँक खाते आणि पासबुक अशी इतर कागदपत्रेही आवश्यक आहेत.

एसबीआय एटीएम फ्रँचायझीसाठी अधिकृत वेबसाइट

टाटा इंडिकॅशच्या अधिकृत वेबसाइट https://indicash.co.in/atm-franchise/ वर जा.

मुथूट एटीएमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://www.muthootgroupatm.com/new-registration.php.

इंडिया वन एटीएमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://india1payments.in/rent-your-space/.

एटीएम फ्रँचायझीमधून कमाई

एटीएम फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्हाला 2 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट करणे आवश्यक आहे आणि 3 लाख रुपयांचे खेळते भांडवल आवश्यक आहे. एसबीआय एटीएम फ्रँचायझींना प्रति रोख व्यवहार 8 रुपये आणि नॉन-कॅश व्यवहारासाठी 2 रुपये मिळतात.

SBI ATM बसवण्यासाठी या नंबरवर संपर्क करा

टोल फ्री क्रमांक: 1800-1122-11

टोल फ्री क्रमांक: 1800-425-3800, 080-265-99990

हे पण वाचा :-  Navpancham Rajyog: तब्बल 30 वर्षांनंतर तयार होणार शनि-शुक्र नवपंचम राजयोग ! ‘या’ राशींचे नशीब चमकणार ; करिअरमध्ये मिळणार यश

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe