SBI Bank Account Opening : आपल्यापैकी अनेकांचे बँकेत अकाउंट असेल. मात्र अजूनही असे काही लोक आहेत ज्यांचे बँकेत खाते नाहीये. तसेच काही लोकांकडे बँक अकाउंट आहे मात्र त्यांना नवीन बचत खाते खोलायचे आहे. दरम्यान जर तुम्हालाही एसबीआयमध्ये बचत खाते खोलायचे असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर एसबीआय ही देशातील सर्वात मोठी पब्लिक सेक्टर बँक आहे.
देशात एकूण 12 पीएसबी आहेत. त्यामध्ये एसबीआयचा देखील समावेश होतो. एसबीआय मध्ये बचत खाते असण्याचे अनेक फायदे ग्राहकांना मिळतात. यामुळे अनेकजण एसबीआय मध्ये बचत खाते खोलत आहेत. मात्र एसबीआयच्या शाखेत जाऊन खाते खोलणे म्हणजे अवघडच आहे.

कारण की एसबीआयची ग्रामीण भागातील शाखा असो किंवा शहरी भागातील शाखा असो कायमच गर्दी पाहायला मिळते. पण, एसबीआयने आता आपल्या ग्राहकांसाठी घरबसल्या बचत खाते उघडण्याची सुविधा सुरू केली आहे.
यामुळे जर तुम्हालाही एसबीआय मध्ये सेविंग अकाउंट खोलायचे असेल तर तुम्हाला आता घरबसल्या हे काम करता येणार आहे. दरम्यान आज आपण एसबीआय मध्ये घरबसल्या बँक अकाउंट कसे ओपन करायचे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे प्रोसेस
तुम्हाला जर घरबसल्या एसबीआयमध्ये बचत खाते खोलायचे असेल तर यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये बँकेचे SBI YONO हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे. हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअर वर मिळून जाईल. प्ले स्टोअर वर गेल्यानंतर हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा.
एप्लीकेशन डाउनलोड झाल्यानंतर एप्लीकेशन ओपन करा. मग New to SBI पर्यायावर जा. त्यानंतर तुम्हाला ओपन अकाउंट विदाऊट ब्रँच व्हिजिट या पर्यायावर जावे लागणार आहे. मग तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार क्रमांक आणि पॅन कार्ड क्रमांक टाकावा लागणार आहे.
मग तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी तुम्हाला दिलेल्या रकान्यात भरायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे आणि संपर्काचा तपशील म्हणजेच मोबाईल नंबर, लँडलाईन नंबर, इमेल असा तपशील भरायचा आहे.
यानंतर तुम्हाला व्हिडिओ कॉल करावा लागणार आहे. तुमच्यासाठी व्हिडिओ केवायसी शेड्यूल केली जाईल. मग बँकेने ठरवून दिलेल्या वेळेत तुम्हाला परत एप्लीकेशन मध्ये लॉगिन करायचे आहे आणि व्हिडिओ केवायसी कम्प्लीट करायची आहे.
एवढे केले की तुमचे काम संपणार आहे. व्हिडिओ केवायसी कम्प्लिट झाल्यानंतर बँकेकडून तुमच्या माहितीची पडताळणी केली जाईल आणि यानंतर मग तुमचे बँक अकाउंट सुरू होणार आहे.
सेविंग अकाउंट सुरू झाल्यानंतर तुम्ही तुमच्या बँक अकाउंट मधून व्यवहार करू शकणार आहात. अर्थातच आता घरबसल्या आणि अवघ्या दहा मिनिटांच्या कालावधीत ग्राहकांना एसबीआय बँकेत सेविंग अकाउंट ओपन करता येणार आहे.