SBI Flexi Cap Fund:- आजच्या आर्थिक स्थितीत लहान गुंतवणुकीपासून जास्त पैसे मिळवणे शक्य आहे. त्याचप्रमाणे SBI फ्लेक्सी कॅप फंड यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकता.
एसबीआय फ्लेक्सी कॅप फंड एक खूप फायद्याचा आणि वैशिष्ट्यपूर्ण फंड आहे. जो मोठ्या, मध्यम आणि लघु कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. फ्लेक्सी कॅप फंडमध्ये गुंतवणूक करतांना थोड्या गोष्टींची काळजी घेतली तरी सर्व प्रकारच्या बाजार परिस्थितीमध्ये चांगला परतावा देऊ शकते.
SBI फ्लेक्सी कॅप फंड काय आहे?
फ्लेक्सी कॅप फंड हा एक विविध गुंतवणूक प्रकाराचा म्युच्युअल फंड आहे.जो विविध आकारांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. त्यात मोठ्या कंपन्यांच्या स्थिरतेला बळकटी मिळते. तर लघु आणि मध्य-आकाराच्या कंपन्यांना दीर्घकालीन वृद्धीचा फायदा मिळवता येतो. त्याचे मुख्य आकर्षण म्हणजे यातील विविधता आणि उत्तम फंड मॅनेजमेंट. या फंडामुळे गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा मिळण्याची शक्यता वाढते.
यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत –
SIP (Systematic Investment Plan) – यामध्ये तुम्ही दरमहा ठराविक रक्कम गुंतवू शकता.
Lumpsum – यामध्ये एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवली जाते.
SBI फ्लेक्सी कॅप फंड मध्ये गुंतवणूक सुरू करण्याची किमान रक्कम ५०० रुपये आणि दरमहा १,००० ची गुंतवणूक केल्यास तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. यामध्ये तुम्ही कमी रक्कम गुंतवून तुमच्या आर्थिक परिस्थितीला अनुकूल असलेल्या योजनेसाठी निवड करू शकता.
काय होईल जर तुम्ही १,००० हजार दरमहा गुंतवले?
SBI फ्लेक्सी कॅप फंडाचे आकर्षण त्याच्या चक्रवाढीच्या गुणकावर आधारित आहे. याचा फायदा तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक करतांना होईल. आता आपण पाहूया, दरमहा १,००० गुंतवून किती मोठा निधी तयार होऊ शकतो…
१० वर्षांची गुंतवणूक (आर्थिक वर्ष)
जर तुम्ही १,००० प्रति महिना गुंतवले आणि त्यास १५% वार्षिक परतावा मिळाला, तर तुम्हाला १० वर्षांमध्ये तुमच्या १,२०,००० गुंतवणुकीवर २,७८,६५७ पर्यंत परतावा मिळू शकतो. म्हणजेच तुमची गुंतवणूक २.३ पट वाढेल
२० वर्षांची गुंतवणूक
जसे-जसे गुंतवणुकीचा कालावधी वाढेल तसा चक्रवाढीचा प्रभाव आणखी दिसून येईल. जर तुम्ही १,००० प्रति महिना गुंतवले आणि ते २० वर्षे सुरु ठेवले तर तुमचे २,४०,००० भांडवल १५,१५,९५५ पर्यंत वाढू शकते. यामुळे तुम्हाला जास्त परतावा मिळेल.
३० वर्षांमधील गुंतवणूक परिणाम
जर तुम्ही ३० वर्षांपर्यंत १,००० प्रति महिना गुंतवले आणि १५% वार्षिक परतावा मिळाला तर तुमचे ३,६०,००० भांडवल ७०,०९,८२१ पर्यंत वाढू शकते. याच्या माध्यमातून तुमच्या गुंतवणुकीला अधिक फायदेशीर बनवता येईल.
३५ वर्षांच्या दीर्घ गुंतवणुकीचा परिणाम
सर्वात मोठा प्रभाव दीर्घकालीन गुंतवणुकीत दिसतो. जर तुम्ही ३५ वर्षांपर्यंत दरमहा १,००० गुंतवले तर तुमचं ४,२०,००० भांडवल १,४८,६०,६४५ पर्यंत वाढू शकते. याचा अर्थ तुमच्या लहान मासिक गुंतवणुकीच्या आधारावर तुम्ही १.४८ कोटी रुपयांचे मोठे भांडवल निर्माण करू शकता.
FUND साठी जोखीम
म्युच्युअल फंड आणि विशेषत: फ्लेक्सी कॅप फंड बाजाराच्या जोखमीच्या अधीन असतात. याचा अर्थ असा की, काही काळासाठी बाजार कमी अधिक चांगले काम करू शकतो आणि परतावा अपेक्षेप्रमाणे कमी जास्त येऊ शकतो. परंतु तरीही दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास चक्रवाढीचा फायदा तुमचं भांडवल वाढविण्यासाठी मदत करू शकतो.
SBI फ्लेक्सी कॅप फंड योग्य आहे का?
SBI फ्लेक्सी कॅप फंड दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. जर तुमचे आर्थिक उद्दिष्टे दीर्घकालीन असतील आणि तुम्हाला बाजाराच्या जोखमीला तोंड देण्याची तयारी असेल तर हा फंड तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. दरमहा १,००० ची गुंतवणूक तुमचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकते. त्यामुळे आर्थिक बाबींचे दीर्घकालीन नियोजन केल्यास तुमच्या छोट्या बचतीतून लाखो रुपयांचे भांडवल तयार होऊ शकते. यासाठी संयम आणि चांगले आर्थिक नियोजन हे महत्त्वाचे आहे.