एसबीआयच्या ‘या’ म्युच्युअल फंडाने 5 वर्षात 1 लाखाचे केले 4 लाख! तुमच्याकरिता गुंतवणुकीसाठी राहील बेस्ट

म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक खूप फायद्याची ठरताना दिसून येत असल्यामुळे गेल्या काही वर्षापासून दर महिन्याला एसआयपीच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे व बऱ्याच म्युच्युअल फंड योजनांमधून परतावा हा 12 ते 15 टक्क्यांपर्यंत मिळत आहे.

Ratnakar Ashok Patil
Published:
sbi matual fund

SBI Healthcare opportunities Fund:- म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक खूप फायद्याची ठरताना दिसून येत असल्यामुळे गेल्या काही वर्षापासून दर महिन्याला एसआयपीच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे व बऱ्याच म्युच्युअल फंड योजनांमधून परतावा हा 12 ते 15 टक्क्यांपर्यंत मिळत आहे.

त्यामुळे आता चांगला परतावा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून म्युच्युअल फंड योजनांना पसंती दिली जात आहे. या सगळ्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये जर आपण एसबीआय म्युच्युअल फंडाच्या हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंडाबद्दल माहिती घेतली तर गेल्या पाच वर्षांमध्ये गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीमध्ये तब्बल चारपट वाढ यामध्ये झाली आहे.

म्हणजे जर पाच वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने एक लाख रुपयांची गुंतवणूक यामध्ये केली असती तर त्या गुंतवणुकीचे सध्याचे मूल्य चार लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते.

कशी राहिली एसबीआय हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंडाची कामगिरी?
जर आपण पाच वर्षांपूर्वी एसबीआय हेल्थकेअर ऑपॉर्च्युनिटीज फंडात एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर सध्या त्याचे व्हॅल्युएशन चार लाख रुपयांपेक्षा जास्त झाली असती.या फंडामध्ये जर पाच वर्षाकरिता दहा हजार रुपयांची महिन्याला एसआयपी केली असती तर बारा लाख रुपयांपेक्षा जास्त फंड यामध्ये आता जमा झाला असता.

ज्या गुंतवणूकदारांनी एकरकमी एक लाख रुपये पाच वर्षाकरिता या फंडामध्ये गुंतवले व पाच वर्षे वार्षिक सरासरी परतावा 32.90% मिळाला असून पाच वर्षानंतर एक लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य 4,14,596 इतके झाले.तसेच महिन्याला दहा हजार रुपयाची एसआयपी पाच वर्षाकरिता केली असती तर या फंडामध्ये सहा लाख रुपये मुद्दल जमा झाली असती

पाच वर्षाचा वार्षिक परतावा 30.9% यामध्ये मिळाला व पाच वर्षानंतर या एसआयपीचे गुंतवणूक मूल्य १२.८० लाख रुपये इतके झाले असते.एसबीआय हेल्थ केअर ऑपॉर्च्युनिटीज फंड ही योजना प्रामुख्याने फार्मासुटिकल आणि हेल्थकेअर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe