SBI Home Loan : नवीन घराचे स्वप्न पाहिले असेल आणि यासाठी होम लोन घेण्याचा प्लॅन असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. खरेतर, अलीकडे प्रॉपर्टीच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की घराचे स्वप्न पूर्ण करायचे असल्यास होम लोनचा पर्याय स्वीकारावा लागतोय.
दरम्यान बँकाही ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत. यावर्षी तर होम लोनचे व्याजदर प्रचंड कमी झाले आहे. देशातील सगळ्यात मोठ्या सरकारी बँकेने म्हणजेच एसबीआय ने देखील होम लोनचे व्याजदर कमी केले आहे.

2025 मध्ये आत्तापर्यंत रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून रेपो रेट मध्ये एक टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. आरबीआय ने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे देशभरातील बँकांनी होम लोन सहित सर्वच प्रकारच्या कर्जांचे व्याजदर कमी केले आहे.
त्यामुळे नव्याने घर खरेदीसाठी होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर एसबीआय ने देखील होम लोनचे व्याजदर घटवले असून सद्यस्थितीला एसबीआय आपल्या ग्राहकांना कमीत कमी 7.50% व्याज दरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे.
मात्र हा बँकेचा सुरुवातीचा व्याजदर आहे आणि याचा फायदा काही मोजक्याच लोकांना मिळतो. या व्याज दरात गृह कर्ज घ्यायचे असल्यास ग्राहकाचा सिबिल स्कोर हा साडेसातशे किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
दरम्यान आज आपण एसबीआय कडून 30 लाखांचे होम लोन घ्यायचे असल्यास व्यक्तीचा मासिक पगार किती असायला हवा याबाबत माहिती पाहणार आहोत.
30 लाखाच्या Home Loan साठी पगार किती पाहिजे?
मिळालेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया कडून तीस वर्षांच्या मुदतीसाठी 30 लाख रुपयांचे गृह कर्ज घ्यायचे असेल तर तुमचा मासिक पगार हा 42 हजार रुपये असणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या नावावर इतर कोणतही सक्रिय कर्ज नसाव. इतर कर्ज सुरू असेल तर अशा प्रकरणात बँकेकडून कर्ज नामंजूर केल जाऊ शकत.
किती EMI भरावा लागणार?
स्टेट बँक ऑफ इंडिया कडून किमान 7.50% इंटरेस्ट रेट वर 30 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे होम लोन मंजूर झाल्यास 21 हजार रुपये ईएमआय भरावा लागणार आहे.
पण या व्याजदरात 750 पेक्षा अधिक सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना तसेच सुरक्षित नोकरी असणाऱ्या ग्राहकांनाच कर्ज मिळणार आहे.