5 हजारांच्या SIP मध्ये होणार 50 लाख रुपये ! SBI च्या ह्या फंडाने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत !

एसबीआय लॉंग टर्म इक्विटी फंड हा विशेषत: एकरकमी गुंतवणुकीवर 5 वर्षांच्या परताव्याच्या बाबतीत श्रेणीतील पहिल्या तीन योजनांमध्ये असून या फंडाने केवळ 5 वर्ष आणि 32 वर्षांत उत्कृष्ट परतावा दिला आहे.

Updated on -

SBI Long Term Equity Fund:- एसबीआय लॉंग टर्म इक्विटी फंड हा विशेषत: एकरकमी गुंतवणुकीवर 5 वर्षांच्या परताव्याच्या बाबतीत श्रेणीतील पहिल्या तीन योजनांमध्ये असून या फंडाने केवळ 5 वर्ष आणि 32 वर्षांत उत्कृष्ट परतावा दिला आहे. या योजनेने गुंतवणूकदारांना भरीव फायदा दिला आहे. जर तुम्ही 1993 मध्ये या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे सध्याचे मूल्य 1.32 कोटी रुपये होईल. याचप्रमाणे 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते आज तिप्पट झाले आहेत.

एकरकमी गुंतवणुकीवर मोठा परतावा

SBI Long Term Equity Fund ला 31 मार्च 1993 रोजी सुरूवात करण्यात आली.त्यावेळी 1 लाख रुपये गुंतवले असते तर सध्या त्याचे मूल्य 1.32 कोटी रुपये होईल. त्याचप्रमाणे 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर ते आज 2.98 लाख रुपये झाले आहेत. या योजनेचा सरासरी वार्षिक परतावा 16.62% आहे.

एसआयपीवर मिळणारा परतावा

SBI Long Term Equity Fund च्या नियमित प्लॅनमध्ये जर 17 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये एकरकमी गुंतवले असते आणि 5000 रुपये मासिक एसआयपी केली असती तर सध्या तुमचे फंड मूल्य 52.17 लाख रुपये झाले असते. याचा वार्षिक परतावा 14.87% होता. यामुळे 17 वर्षांच्या कालावधीत या योजनेत दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक करत असताना, त्याला एक लक्षणीय परतावा मिळाल्याचे स्पष्ट होते.

ईएलएसएसवर टॅक्स बेनिफिट

SBI Long Term Equity Fund हा एक इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्स स्कीम (ELSS) असून या योजनेत 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळते. याशिवाय या योजनेत 3 वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. 3 वर्षांनंतर झालेल्या नफ्यावर 12.5% दीर्घकालीन भांडवली नफा कर लागू होतो.परंतु 1.25 लाख रुपयांपर्यंतच्या नफ्यावर कोणताही कर लागू होत नाही.

हा फंड फायद्याचा का?

SBI Long Term Equity Fund ही एक आकर्षक गुंतवणूक संधी आहे.ज्यात चांगला परतावा मिळवण्याची मोठी शक्यता आहे. जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या योजनेत गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच एसआयपी किंवा एकरकमी गुंतवणूक करत असताना तुम्हाला भविष्यात चांगल्या परताव्याची अपेक्षा करता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe