एसबीआय म्युच्युअल फंडात 500 रुपयांची गुंतवणूक देईल तुम्हाला 35 लाख परतावा! कसे आहे कॅल्क्युलेशन?

गुंतवणुकीच्या दृष्टीने गेल्या काही वर्षापासून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. म्युच्युअल फंड एसआयपी हा एक गुंतवणुकीसाठीचा उत्तम असा पर्याय असून चांगला परतावा मिळण्याच्या दृष्टिकोनातून या योजना अतिशय फायद्याच्या ठरतात.

Ratnakar Ashok Patil
Published:
sbi matual fund

SBI Mutual Fund SIP:- गुंतवणुकीच्या दृष्टीने गेल्या काही वर्षापासून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. म्युच्युअल फंड एसआयपी हा एक गुंतवणुकीसाठीचा उत्तम असा पर्याय असून चांगला परतावा मिळण्याच्या दृष्टिकोनातून या योजना अतिशय फायद्याच्या ठरतात.

जर आपण नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या अनुषंगाने बघितले तर असे गुंतवणूकदार चांगला व्याजदर आणि गुंतवणुकीची सुरक्षिततेची हमी मिळेल अशा योजना शोधत असतात व याकरिता म्युच्युअल फंडाच्या बऱ्याच योजना खूप फायद्याच्या ठरतात.

यामध्ये जर एसबीआय म्युच्युअल फंड एसआयपी योजना बघितली तर गुंतवणुकीची सुरक्षितता आणि चांगला परतावा मिळवण्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात.

कसे आहे एसबीआय म्युच्युअल फंड एसआयपीचे स्वरूप?
एसबीआय म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी खूप महत्त्वाचा असा फंड आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना पाचशे रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करता येऊ शकते. पाचशे रुपयांच्या कमीत कमी गुंतवणुकीत तुम्ही दीर्घकाळ एसआयपी करत गेलात तर चांगला फंड यामध्ये जमा करू शकतात.

एसबीआय म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये पाचशे रुपये प्रत्येक महिन्याला गुंतवले तरी तुम्ही 35 लाख रुपयांचा निधी या माध्यमातून जमा करू शकतात.

एसबीआय म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणुकीवर वार्षिक पंधरा टक्के व्याजदर मिळतो व हा व्याजदर सर्वोत्तम असल्यामुळे मोठा कॉर्पस या माध्यमातून तयार होऊ शकतो.

प्रतिमाह पाचशे रुपयांची गुंतवणूक वर्षनिहाय किती देईल परतावा?

1- पहिल्या वर्षातील कमाई- समजा तुम्ही एका वर्षामध्ये पाचशे रुपयांची एसआयपी प्रत्येक महिन्याला या फंडात करायला सुरुवात केली तर सहा हजार रुपये तुमचे जमा होतात व या जमा रकमेवर तुम्हाला 15 टक्क्यांचा परतावा मिळाला तर ही रक्कम 6511 रुपये होते.

2- दहा वर्ष गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन- एसबीआय म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही दहा वर्ष कालावधीसाठी महिन्याला पाचशे रुपयांची एसआयपी सुरू केली तर 15% व्याजदर मिळून तुमची मूळ गुंतवणूक आणि व्याज एक लाख 39 हजार 329 रुपये जमा होते. म्हणजे दहा वर्षांमध्ये तुम्ही लाखो रुपये या माध्यमातून कमवू शकतात.

3- वीस वर्षे गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन- समजा तुम्ही एसबीआय म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही वीस वर्षापर्यंत पाचशे रुपयांची दरमहा एसआयपी सुरू केली तर व्याज आणि मुद्दल मिळून तुमच्या खात्यामध्ये सात लाख 57 हजार 977 रुपये जमा होतात.

4- तीस वर्ष गुंतवणुकीची गणना- प्रत्येक महिन्याला पाचशे रुपयांची गुंतवणूक तुम्ही 30 वर्षापर्यंत सुरू ठेवली तर या एसआयपीतून तुम्हाला व्याज आणि मुद्दल मिळून तब्बल 35 लाख 4 हजार 910 रुपयांचा निधी मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe