SBI Vs Post Office RD : भविष्याचा विचार करता आतापसूनच गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे. अशातच पगारदार वर्गातील लोकांसाठी दरमहा मोठी बचत करणे फार कठीण होऊन बसते. म्हणूनच अशा लोकांच्या गुंतवणुकीसाठी आवर्ती ठेव (RD) योजना तयार करण्यात आली आहे. दर महिन्याला काही पैसे वाचवून पगारदार वर्ग आरडीत गुंतवणूक करू शकतो. आणि भविष्यात मोठा निधी तयार करू शकतो.
आरडीमध्ये मोठा फंड कसा तयार करू शकतो?
यामध्ये तुम्ही दर महिन्याला पैसे गुंतवता आणि त्यानंतर तुम्हाला निश्चित व्याज मिळते. आरडी जास्तीत जास्त10 वर्षांसाठी असते, यावर कमाल मर्यादा नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यासह अनेक बँकांव्यतिरिक्त, पोस्ट ऑफिस देखील आरडी ऑफर करते. आरडीवर प्रत्येकाचे व्याजदर वेगवेगळे असतात. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस आणि एसबीआय बँकेच्या आरडीबद्दल सांगणार आहोत.
SBI आवर्ती ठेवी
एसबीआय एक वर्ष ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी आरडी ऑफर करत आहे. SBI सामान्य लोकांना आवर्ती ठेव (SBI RD) वर 6.5% ते 7% व्याज देत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना 7% ते 7.5% व्याज देत आहे. हे दर 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू आहेत.
SBI – RD दर
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी 6.80% (सर्वसाधारण) 7.30% (ज्येष्ठ नागरिक)
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी 7% (सर्वसाधारण) 7.50% (ज्येष्ठ नागरिक)
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी 6.50 (सर्वसाधारण) 7.00 (ज्येष्ठ नागरिक)
5 वर्षे आणि 10 वर्षांपर्यंत 6.50 (सर्वसाधारण) 7.50 (ज्येष्ठ नागरिक)
पोस्ट ऑफिस आरडी
पोस्ट ऑफिस आरडी 5 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसह येते. पोस्ट ऑफिस आरडी योजना ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजाचा लाभ देत नाही. सरकारने नुकतेच पोस्ट ऑफिस आरडीवरील व्याज वाढवले आहे. हे नवीन दर 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू आहेत. यावरील व्याज दर तिमाहीत ठरवले जाते.
पोस्ट ऑफिस आरडी
5 वर्षे RD – 6.7%
आरडी व्याजावर कर आकारला जातो
RD वर मिळणाऱ्या व्याजावर TDS कापला जातो. RD वर मिळालेल्या व्याजदरांवर 10% TDS लागू आहे. जर RD वर एक महिन्याचे व्याज 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर TDS कापला जाईल. SBI बँक ज्येष्ठ नागरिकांना RD वर जास्त व्याज देत आहे. येथे गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. त्याचप्रमाणे, जर सामान्य लोक आरडीमध्ये एक किंवा 2 वर्षांसाठी गुंतवणूक करत असतील तर एसबीआय अधिक व्याज देत आहे.