SBI vs Post Office : जर तुम्हाला मुदत ठेवींमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करायची असेल आणि तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करण्याबाबत संभ्रमात असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी या प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत. येथे आम्ही तुम्हाला एसबीआय आणि पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षाच्या एफडीबद्दल सांगणार आहोत.
सध्या तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षांच्या एफडीवर 7.5 टक्के परतावा मिळत आहे. तर स्टेट बँके यावर 6.75 टक्के परतावा देत आहे. येथे आम्ही तुम्हाला एसबीआयमध्ये 5 वर्षांसाठी 2 लाख रुपये गुंतवल्यास, आणि पोस्टात 2 लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला किती परतावा मिळेल याबद्दल सांगणार आहोत, चला तर मग…
जर तुम्ही स्टेट बँकेत 5 वर्षांसाठी 2 लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला 6.75 टक्के दराने 79,500 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 2,79,500 रुपये मिळतील. दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांनी 5 वर्षांसाठी त्यात 2 लाख रुपये जमा केल्यास त्यांना अधिक लाभ मिळतील. सध्या ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 7.25 टक्के दराने व्याज दिले जात आहे. या प्रकरणात, त्यांना एकूण 86,452 रुपये व्याज म्हणून मिळतील आणि अशा प्रकारे एकूण 2,86,452 रुपये मॅच्युरिटीवर मिळतील.
पोस्ट ऑफिसबद्दल बोलायचे झाले तर सध्या पोस्ट ऑफिसमध्ये 7.5 टक्के दराने व्याज दिले जात आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही 5 वर्षांसाठी 2 लाख रुपये गुंतवल्यास, तुम्हाला परिपक्वतेवर व्याज म्हणून 89,990 रुपये मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटीवर एकूण 2,89,990 रुपये मिळतील. परिपक्वतेवर ज्येष्ठ नागरिकांनाही तेवढीच रक्कम मिळेल. अशा स्थितीत पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षांच्या एफडीवर जास्त फायदा होतो.
SBI बँकेचे इतर FD व्याजदर
1 वर्षापेक्षा जास्त परंतु 2 वर्षांपेक्षा कमी: 6.80 टक्के
2 वर्षांपेक्षा जास्त परंतु 3 वर्षांपेक्षा कमी: 7.00 टक्के
3 वर्षांपेक्षा जास्त परंतु 5 वर्षांपेक्षा कमी: 6.75 टक्के
5 वर्षांपेक्षा जास्त परंतु 10 वर्षांपर्यंत: 6.50 टक्के
लक्षात घ्या ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के जास्त मिळते.
पोस्ट ऑफिसच्या इतर एफडीवरील व्याजदर
1 वर्षाच्या FD वर : 6.00 टक्के
2 वर्षाच्या FD वर : 7.00 टक्के
3 वर्षाच्या FD वर : 7.10 टक्के
5 वर्षांच्या FD वर : 7.50 टक्के