SBI Personal Loan : प्रत्येकाला पैशाची गरज असते. काहींकडे त्यांच्या गरजेइतके पुरेसे पैसे असतात तर काहींकडे त्यांच्या गरजेइतके पैसे नसतात. त्यामुळे अनेकजण कर्ज काढतात. तुम्हालाही पैशांची गरज असेल तर तुम्ही झटपट SBI पर्सनल कर्ज काढू शकता.
SBI पर्सनल कर्ज तुम्ही अगदी सहज मिळवू शकता. यासाठी बँकेकडून SBI Quick Personal Loan सुविधा सुरु केली आहे. याद्वारे बँकेकडून ग्राहकांना अगदी काही मिनिटांमध्ये झटपट कर्ज दिले जात आहे. याठिकाणी तुम्ही त्वरीत 20 लाखांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जासाठी डिजिटल मंजुरी मिळवू शकता.

SBI वैयक्तिक कर्जाचे व्याज दर
2024 मधील कर्जाचे व्याजदर SBI बँकेकडून जाहीर करण्यात आले आहेत. जर SBI कडून पर्सनल कर्ज घेतले तर याचा परतफेड कालावधी 6 महिने ते 72 महिने इतका असणार आहे. कर्जावर प्रक्रिया शुल्क म्हणून 1.50 टक्के आहे. SBI क्विक पर्सनल लोनसाठी 11.30%-14.30% p.a. व्याजदर आकारला जात आहे.
SBI वैयक्तिक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा
जर तुम्हालाही घरबसल्या SBI वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर अगदी सहज करू शकता.
सर्वात प्रथम तुम्हाला https://www.sbiloansin59minutes.com/signup साइटला भेट द्यावी लागेल.
याठिकाणी तुम्हाला तुमचे नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी भरून तुम्ही नोंदणी करू शकता.
ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोडद्वारे लॉग इन करा आणि पासवर्ड देखील सेट करा.
तुम्ही पहिल्यांदाच असे कर्ज घेत असाल तर तुमची प्रोफाईल बनवावी लागेल. डॅशबोर्डवरून प्रोफाइल ऑप्शनवर क्लिक करा.
त्यानंतर लोन ऑप्शनमधून, तुम्हाला पर्सनल लोन विभागात जा. तुम्ही कशासाठी कर्ज घेत आहेत हे नमूद करा आणि proceed वर क्लिक करा.
वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ITR अपलोड करावा करावा लागेल.
ITR अपलोड केल्यानंतर वेगळ्या पेजवर तीन महिन्यांचे बँक स्टेटमेंट अपलोड करावे लागेल.
त्यानंतर पुढील माहिती भरून नियम व अटी वाचल्यानंतर Agree बटणावर क्लिक करा.
त्यानंतर क्रेडिट डेटा मिळविण्यासाठी नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP पाठवला जाईल. तुम्हाला पडताळणी करावी लागेल.
आता वैयक्तिक कर्ज पृष्ठावर पोहोचाल जिथे तुम्हाला किती कर्ज हवे आहे ते टाकावे लागेल.
येथे विविध कर्ज देणाऱ्या बँकांचे पर्याय दिसतील, जेथे व्याजदरांची तुलना करता येईल. त्यानंतर तुम्हाला ज्या बँकेतून कर्ज घ्यायचे आहे त्या बँकेची शाखा, शहर इत्यादी निवडून फॉर्म भरावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत ईमेलद्वारे तत्वतः मान्यता पत्र प्राप्त होईल. पुष्टी केल्यानंतर, कर्जाची रक्कम तुमच्या खात्यावर पाठवली जाईल.
SBI वैयक्तिक कर्जासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असतील:
कर्ज अर्ज फॉर्म
2 पासपोर्ट आकाराचे फोटो
ड्रायव्हिंग लायसन्स/पासपोर्ट/पॅन/मतदार आयडी
आयकर, पॅन कॉपी
निवासी पत्त्याचा पुरावा जसे की भाडे करार/पासपोर्ट/युटिलिटी बिल (3 महिन्यांपर्यंत जुने).
उत्पन्नाचा पुरावा कागदपत्रे जसे की 3 महिन्यांची पगार स्लिप, बँक स्टेटमेंट, EMI डेबिट संदेश.