SBI Personal Loan Details : एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, सोनेतारण कर्ज, व्यावसायिक कर्ज, शैक्षणिक कर्ज अशा विविध प्रकारचे कर्ज बँकेकडून उपलब्ध करून दिले जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे एसबीआय ग्राहकांना परवडणार अशा इंटरेस्ट रेट मध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते. महिलांना इतर ग्राहकांच्या तुलनेत कमी इंटरेस्ट रेट वर कर्ज मिळते.
दरम्यान आज आपण एसबीआयच्या वैयक्तिक कर्जासंदर्भात माहिती पाहणार आहोत. खरे तर कोणत्याही बँकेकडून वैयक्तिक कर्जासाठी इतर कर्जांच्या तुलनेत अधिकचे व्याजदर आकारले जाते.
एसबीआय बँक देखील तसेच करत आहे. एसबीआय बँक कडून दिल्या जाणाऱ्या इतर कर्जांच्या तुलनेत वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे काहीसे अधिक असल्याचे पाहायला मिळाले आहे.
त्यामुळे फारच आवश्यकता असेल तेव्हाच वैयक्तिक कर्ज काढावे अन्यथा इतर पर्यायी मार्गाने पैशांची उपलब्धता करावी असे आवाहन जाणकारांनी केले आहे.
दरम्यान आज आपण जर एखाद्या ग्राहकाने एसबीआय बँकेकडून साडेचार लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले तर त्याला किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
एसबीआयचे वैयक्तिक कर्ज
एससबीआय बँक आपल्या ग्राहकांना 11.45% या सुरुवातीच्या व्याजदरावर वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत आहे. मात्र या सुरुवातीच्या व्याजदराचा फायदा फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला आहे अशाच लोकांना मिळणार आहे. ज्या लोकांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास आहे अशा लोकांना या इंटरेस्ट रेटवर वैयक्तिक कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे.
चार लाख 50 हजार रुपये मंजूर झाले तर कितीचा हप्ता?
जर समजा एखाद्या ग्राहकाला 11.45% या किमान व्याजदरावर पाच वर्ष कालावधीसाठी चार लाख 50 हजार रुपये मंजूर झाले तर अशा ग्राहकाला 9,885 रुपये एवढा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच या कालावधीत सदर ग्राहकाला पाच लाख 93 हजार 100 रुपये बँकेला द्यावे लागणार आहेत. यामध्ये साडेचार लाख रुपये कर्जाची रक्कम वगळता जवळपास एक लाख त्रेचाळीस हजार शंभर रुपये व्याज म्हणून ग्राहकाला भरावे लागणार आहेत.