Fixed Deposit : देशातील सर्वात मोठी बँक SBI ने नुकतीच FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. याआधी नोव्हेंबरमध्ये पीएनबीने एफडी व्याजदरात वाढ केली होती आणि ऑक्टोबरमध्ये खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेने. आज या तिन्ही बँकांच्या FD व्याजदरांबद्दल जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला कोणती बँक सर्वात जास्त व्याज देत आहे हे सहज कळू शकेल.
SBI ने अलीकडेच 7 दिवसांपासून ते 45 दिवसांपर्यंतच्या FD वरील व्याजदर 3.5 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. पूर्वी तो 3 टक्के होता. आता 46 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवरील व्याजदर 4.5 टक्क्यांवरून 4.75 टक्के झाला आहे. 180 ते 210 दिवसांच्या FD वर व्याज 5.75 टक्के झाले आहे. 211 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याजदर 6 टक्के करण्यात आला आहे. पूर्वी तो 5.75 टक्के होता.
याशिवाय तीन वर्षे ते पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदर 6.50 टक्क्यांवरून 6.75 टक्के करण्यात आला आहे. SBI च्या 400 दिवसांच्या जास्तीत जास्त FD वरील व्याजदर 7.10 टक्के करण्यात आला आहे.
एचडीएफसी बँकेचे एफडी व्याजदर
HDFC बँकेतील गुंतवणूकदारांना 3 टक्के ते 7.20 टक्के व्याजदर मिळत आहेत. सर्वसामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांना बँक 3.50 टक्के ते 7.75 टक्के व्याज देत आहे. बँकेतील सामान्य गुंतवणूकदारांना 55महिन्यांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज मिळत आहे, जे 7.20 टक्के आहे.
पंजाब नॅशनल बँकेत एफडीचे व्याजदर
PNB 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर सामान्य गुंतवणूकदारांना 3.5 टक्के ते 7.25 टक्के व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ते ४ टक्के ते 7.75 टक्के आहे. बँक 444 दिवसांच्या FD वर सर्वाधिक व्याज देत आहे.