SBI RD Scheme : सध्या बचत करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, तरीही आजही अनेकजणांना आवर्ती ठेव योजनांमध्ये पैसे गुंतवायला खूप आवडते. आवर्ती ठेव योजनेत, ग्राहकांना प्रत्येक महिन्याला आरडी खात्यात एक निश्चित रक्कम जमा करावीच लागते.
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आता आपल्या ग्राहकांसाठी एक आवर्ती ठेव आणली आहे. त्यात जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला गुंतवलेल्या पैशांवर सर्वात जास्त व्याज मिळेल. कसे ते जाणून घ्या सविस्तरपणे.
आता तुम्हाला बँकेकडून चांगला परतावाही मिळेल. विविध कालावधीसाठी बँकेचे व्याजदरही वेगवेगळे असते. यात सर्वसामान्यांसाठी 6.80 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के इतका व्याजदर आहे. तुम्ही या योजनेमध्ये अवघ्या 100 रुपयांपासूनही गुंतवणूक सुरू करू शकता. आवर्ती ठेवीमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे जमा करावे लागतात, हे लक्षात ठेवा. तसेच तुम्हाला तुमच्या RD साठी 1 ते 10 वर्षांचा कालावधी निवडता येईल.
किती मिळेल व्याज?
स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे आरडी सुविधा प्रदान करण्यात येते. ज्यात बँकेच्या ग्राहकांना चांगल्या व्याजाचा लाभ मिळतो. ग्राहकांना एसबीआयच्या आवर्ती ठेवींवर ६.८ टक्के दराने व्याज देण्यात येत आहे. त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना ७.५ टक्के दराने व्याज मिळेल.
बँक आपल्या ग्राहकांना कमाल 10 वर्षांच्या कालावधीसाठी आरडी करण्याची संधी देते. विशेष म्हणजे या सरकारी बँकांच्या यादीत SBI बँकेचा पहिला क्रमांक येतो. तुम्हाला तुमच्या सोयीनुसार वेगवेगळ्या कालावधीसाठी आरडी करता येईल.
करता येईल १०० रुपयांपासून सुरुवात
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत तुम्ही १०० रुपयांपासून सुरुवात करता येईल. तसेच तुम्हाला दर महिन्याला पैसे जमा करावे लागणार आहेत. तुम्ही 1 वर्ष ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी RD करता येईल.
कसे मिळतील 55,000 रुपये?
तुम्हाला 55000 रुपये व्याज पाहिजे असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5000 रुपयांची आरडी करावी लागणार आहे. शिवाय तुम्हाला ५ वर्षांच्या कालावधीसाठी आरडी करावी लागेल. यावर तुम्हाला बँकेकडून ६.५ टक्के दराने व्याज दिले जाईल. प्रत्येक वर्षी चक्रवाढ करण्यात आलेल्या रकमेवरील व्याजात वाढ होईल. तुम्हाला 5 वर्षांनी 54,957 रुपये व्याज मिळेल.
कालावधी
- सर्वसामान्य नागरिकांना 1 ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या RD वर 6.80 टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना ७.३० टक्के व्याज मिळेल.
- सर्वसामान्य नागरिकांना 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या आरडीवर 7 टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याज मिळेल.
- सर्वसामान्य नागरिकांना 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आरडीवर 6.50 टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना 7 टक्के व्याज मिळेल.
- सर्वसामान्य नागरिकांना 5 ते 10 वर्षांच्या आरडीवर 6.50 टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याज मिळेल.