तृतीयपंथी दाढी कशी करतात? का असते त्यांना गुरुची आवश्यकता? वाचा महत्त्वाची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर आपला समाज पहिला तर यामध्ये प्रामुख्याने पुरुष आणि स्त्री ही दोन लिंग सोडली तर त्यानंतर आपल्याला इतर लिंगमध्ये तृतीयपंथी यांचा समावेश करावा लागतो. आपल्याला माहित आहे की ही तृतीय पंथीयांचे शरीर जरी पुरुष असले तरी त्यांची लिंग तसेच वेशभूषा व अभिव्यक्ती स्त्री प्रमाणे असते व या अशा सगळ्या दिसण्यामुळे समाजामध्ये जरा वेगळी भावना तृतीयपंथीयांबद्दल दिसून येते.

समाजाची ही जी काही तृतीय पंथीयांबद्दल मानसिकता आहे ती बदलावी आणि त्यांना मूलभूत सुख सोयी तसेच सुविधा मिळाव्यात याकरिता त्यांच्या हक्कासाठी व अस्तित्वासाठी लढणाऱ्या महान व्यक्तिमत्व म्हणजे गौरी सावंत होय. तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या गौरी सावंत या सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांच्या जीवनावर आधारित सध्या ताली नावाची वेब सिरीज आली असून ती प्रचंड चर्चेत आहे. याच महत्त्वाच्या अशा गौरी सावंत यांनी एबीपी माझाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती व त्यामध्ये त्यांनी स्वतःचा जीवन प्रवास व सामाजिक लढा तसेच तृतीयपंथी यांचे आयुष्य याविषयी महत्त्वपूर्ण खुलासा केला.

 गौरी सावंत यांनी तृतीयपंथी विषयी दिलेली महत्त्वाची माहिती

तृतीय पंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित असलेली ताली नावाची वेब सिरीज सध्या प्रचंड प्रमाणात चर्चेत असून अभिनेत्री सुष्मिता सेन यांनी गौरी सावंत यांची भूमिका या वेब सिरीजमध्ये साकारली आहे. गौरी सावंत यांचा जर आपण विचार केला तर त्या गेले किती वर्षापासून तृतीयपंथी समाजाकरिता महत्वपूर्ण काम करत असून हे काम करत असताना त्यांना आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अडचणींचा आणि संकटाचा सामना करावा लागला.

नुकतीच त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती व त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला. यामध्ये त्यांनी बोलताना म्हटले की साडी कशी नेसायची व कसं बसायचं? इत्यादी बाबी देखील मला माझ्या गुरूंच्या माध्यमातून शिकवल्या गेल्या. तसेच काही कालावधीनंतर आम्हाला देखील दाढी यायला लागते व ही दाढी करायला आमच्याकडे एक चिमटा असतो व त्या चिमट्याच्या साहाय्याने एक एक केस आम्ही ओढून काढतो असे देखील त्यांनी म्हटले.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, बाईपण एवढे सोपे नसून पुरुषांच्या हार्मोन्स शरीरात असल्यामुळे दाढी येणे हे स्वाभाविक असते. अशा वेळेला गुरु आईच्या मांडीवर डोकं ठेवून त्यांनी दाढी कशी करायची हे मला शिकवले. यामध्ये दोन रुपयांच्या ब्लेडने जर दाढी केली तर ती दुसऱ्या दिवशी परत येणार त्यापेक्षा मुळापासून दाढी करायची जेणेकरून पंधरा दिवसांनी येईल व या सगळ्या गोष्टी आम्हाला गुरूंकडून शिकवले जातात असे देखील त्यांनी म्हटले.

तसेच त्यांनी सांगितले की आमचे गुरु सुरुवातीला आम्हाला घर देतात व घरात छोटेसे देवघर असते. गुरु खाटीवर झोपतात व इतर जे काही गुरू भाऊ असतात ते खाली झोपतात. प्रत्येकाने भीक मागून जे काही पैसे आणलेले असतात त्याची वाटणी केली जाते. एवढेच नाही तर रोजच्या जेवणाचे पैसे गुरूला देऊन बाकीचे पैसे भविष्यासाठी बचत केले जातात. यामुळे सुरुवातीला प्रत्येकाला गुरुची गरज असतेच असे देखील गौरी सावंत यांनी यादरम्यान सांगितले.

 गौरी सावंत यांचा अल्पसा परिचय

गौरी सावंत यांचा जन्म हा महाराष्ट्रातील रत्नागिरी या ठिकाणी झाला व बालपण पुणे येथे गेले. तसे पाहायला गेले तर त्यांचे नाव गणेश सावंत असे होते. त्यांचा जन्म एका मराठी कुटुंबात झाला व वडील पोलीस अधिकारी आहेत. बालपण एकदम सुरळीत जात होते परंतु गणेश जेव्हा सात वर्षाचा होता तेव्हा त्याच्या आईचे निधन झाले. परंतु गणेशला शरीर जरी पुरुषाच दिलं होतं तरी त्याला मुलींसारखं राहायला आवडायचं नटायला थाटायला देखील आवडायचे.

परंतु घरच्यांना गणेशचे हे वागणे आवडत नसे. या सगळ्यांमुळे लोक देखील त्याला चिडवायचे. गणेशाचे वडील पोलीस अधिकारी असल्यामुळे समाजामध्ये त्यांचे नाव खराब होऊ शकते याची भीती गणेशला होती म्हणूनच त्याने एके दिवशी टेबलावरील साठ रुपये उचलले आणि घर सोडले ते कायमचे व इथूनच गणेशाची गौरी म्हणून सुरुवात झाली.

आज जर आपण त्यांचे काम पाहिले तर मुंबई या ठिकाणी ते भारतीय ट्रान्सजेंडर कार्यकर्ते आहेत व एवढेच नाही तर सखी चारचौघी या एनजीओ ट्रस्टच्या संस्थापक देखील आहेत. हा ट्रस्ट ट्रांसजेंडर लोकांना आणि एचआयव्हीग्रस्त लोकांना मदतीचा हात पुढे करतो व हा ट्रस्ट 2000 यावर्षी स्थापन करण्यात आलेला होता. 2014 यावर्षी ट्रांसजेंडर लोकांच्या हक्काकरिता भारताच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या त्या पहिल्या ट्रान्सजेंडर व्यक्ती ठरल्या.