SBI Scheme : तुम्ही देखील तुमच्या भविष्याचा विचार करून लहान बचत योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असला तर तुमच्यासाठी देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो SBI त्यांची लोकप्रिय रिकरिंग डिपॉझिट योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे.
यामुळे या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना मालामाल होण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि रिकरिंग डिपॉझिटवरील नवीन व्याजदर 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू करण्यात आले आहे. याचा प्रभाव 12 महिने ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी उघडलेल्या खात्यावर दिसून येणार आहे. याशिवाय एसबीआयनेही त्यांच्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.
नवीन आरडी दर
आरडी खाते 12 महिने ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी उघडले जाऊ शकते आणि फक्त 100 रुपयांच्या ठेवीसह सुरू केले जाऊ शकते. यामध्ये 6.5 टक्के ते 7 टक्के व्याज उपलब्ध आहे. वेगवेगळ्या कालावधीत उपलब्ध असलेला RD व्याजदर खालीलप्रमाणे आहे.
तुम्हाला एक वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी RD वर 6.8% व्याजदर मिळेल. दोन वर्षे ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी FD वरील व्याजदर पूर्वीच्या 6.75% वरून 25 बेसिस पॉइंट्सने 7% पर्यंत वाढवला आहे. तीन वर्षे ते पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी दर 6.5% आहे. पाच वर्षे ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 6.5% व्याजदर आहे.
गुंतवणूक वेळ | RD व्याज दर |
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी | 6.8% |
2 वर्ष ते तीन वर्षांपेक्षा कमी | 7% |
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी | 6.5% |
5 वर्षे ते 10 वर्षांपेक्षा कमी | 6.5% |
एफडीचे दरही वाढले आहेत
आम्ही तुम्हाला सांगतो की स्टेट बँक ऑफ इंडियाने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील (FDs) व्याजदर 5 bps वरून 25 bps पर्यंत वाढवले आहेत. नवीन दरांनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 3.00 टक्के ते 7.00 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 7.50 टक्के व्याज मिळत आहे.
हे पण वाचा :- Modi Government : महागाईतून मिळणार दिलासा ! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार ‘इतके’ हजार रुपये