SBI Vs HDFC Home Loan : तुम्हालाही गृह कर्ज घ्यायचे आहे का मग आजची बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. आज आपण देशातील दोन प्रमुख बँकांच्या गृह कर्जाची माहिती जाणून घेणार आहोत. एसबीआय आणि एचडीएफसी या देशातील दोन प्रमुख बँकांच्या गृह कर्जाची आज आपण थोडक्यात तुलना करणार आहोत.
खरे तर या वर्षात देशातील सर्वच बँकांनी होम लोनच्या व्याजरात कपात केली आहे. आरबीआयने रेपो रेट मध्ये कपातीचा निर्णय घेतल्यानंतर बँकांनी सर्वच प्रकारच्या व्याजदरात कपात केली आहे.

एफडीचे व्याजदर सुद्धा कमी करण्यात आले आहेत. यामुळे आरबीआयच्या या निर्णयाचा कर्ज घेणाऱ्यांना फायदा मिळतोय तर दुसरीकडे गुंतवणूक करणाऱ्यांना यामुळे थोडे नुकसानही सहन करावे लागत आहे.
बँकांनी व्याजदरात कपात केली असल्याने हा काळ होम लोन घेण्यासाठी सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा केला जातोय. अशा स्थितीत जर तुम्ही पण कर्ज काढून घर बांधण्याच्या तयारीत असाल तर एसबीआय किंवा मग एचडीएफसी तुमच्यासाठी बेस्ट पर्याय राहणार आहे.
एसबीआयचे गृह कर्ज कसे आहे
स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना किमान 7.50% व्याज दरात गृह कर्ज देते. पण या व्याजदराचा फायदा फक्त 700 किंवा त्यापेक्षा अधिक सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांनाच मिळत आहे.
सिबिल स्कोर कमी असेल तर बँकेकडून किमान व्याजदराचा फायदा दिला जाणार नाही. सिबिल स्कोर खराब असणाऱ्या ग्राहकांना यापेक्षा अधिक व्याजदरात कर्ज मंजूर होते.
एचडीएफसीचे व्याजदर कसे आहे?
एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी बँक. प्रायव्हेट सेक्टर मधील ही बँक देशातील कंपन्यांमध्ये समाविष्ट आहे. एसबीआय पेक्षा एचडीएफसी बँक मोठी आहे.
मार्केट कॅपिटल नुसार एचडीएफसी बँक देशातील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये स्थान मिळवते. एचडीएफसी बँक मात्र आपल्या ग्राहकांना किमान 7.90% व्याज दरात गृहकर्ज देते.
अर्थात एसबीआय पेक्षा एचडीएफसी चे गृह कर्ज थोडे महाग आहे. तसेच एचडीएफसीच्या किमान व्याजदराचा फायदा घ्यायचा असेल तर ग्राहकांचा सिबिल स्कोर 750 किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
बँक ऑफ बडोदाचे गृह कर्ज कसे आहे?
बँक ऑफ बडोदा एसबीआय पेक्षा स्वस्तात गृह कर्ज देत आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना किमान 7.45% व्याज दरात कर्ज देते. यामुळे जर तुम्हाला होम लोन घ्यायच असेल तर तुम्ही सर्वप्रथम बँक ऑफ बडोदाचा विचार करायला हवा.