SBI, HDFC, ICICI बँक एफडीवर किती व्याज देत आहे ? कोणत्या बँकेत एफडी करणे ठरणार फायदेशीर, पहा…

Tejas B Shelar
Published:
SBI Vs HDFC Vs ICICI Bank FD News

SBI Vs HDFC Vs ICICI Bank FD News : अलीकडे बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याला विशेष पसंती दाखवली जात आहे. कारण की, अलीकडील काही वर्षांमध्ये बँकेच्या माध्यमातून एफडीवर चांगले व्याज दिले जात आहे. दरम्यान, जर तुमचाही येत्या काही दिवसात बँकेत एफडी करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच फायदेशीर ठरणार आहे.

कारण की, आज आपण एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय या प्रमुख तीन बँकांच्या एफडीची तुलना करणार आहोत. आज आपण या तिन्ही बँकांच्या पाच वर्षांच्या एफडी मध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना किती परतावा मिळणार याची तुलना करणार आहोत.

जेणेकरून या तिन्ही बँकांपैकी कोणत्या बँकेतून चांगला परतावा मिळत आहे याबाबत आपल्याला माहिती मिळेल. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

एसबीआय बँकेची पाच वर्षांची एफडी योजना : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या सामान्य ग्राहकांना पाच वर्षे ते दहा वर्षे कालावधीच्या एफडीवर 6.50% आणि सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.50% या रेटने व्याज देत आहे.

म्हणजे जर सामान्य ग्राहकांनी या योजनेत दहा लाख रुपये गुंतवलेत तर त्यांना 13 लाख 80 हजार 419 रुपये आणि जेष्ठ नागरिकांनी या योजनेत तेवढेच पैसे गुंतवलेत तर त्यांना 14 लाख 49 हजार 948 रुपये मिळणार आहे.

HDFC बँकेची पाच वर्षाची FD योजना : एचडीएफसी बँक पाच वर्षांच्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना सात टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50% या दराने व्याज देत आहे.

यानुसार जर या योजनेत सामान्य ग्राहकांनी दहा लाख रुपये गुंतवले तर त्यांना 14 लाख 14 हजार 621 रुपये मिळणार आहेत आणि जेष्ठ नागरिकांनी जर यामध्ये तेवढेच पैसे गुंतवले तर त्यांना 14 लाख 49 हजार 948 रुपये मिळणार आहेत.

आयसीआयसीआय बँक : सध्या ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना पाच वर्ष कालावधीच्या एफडीवर सात टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50% या दराने व्याज देत आहे.

यानुसार जर सामान्य ग्राहकांनी या एफडी मध्ये दहा लाख रुपये गुंतवले तर त्यांना 14 लाख 14 हजार 778 रुपये मिळणार आहेत. तसेच जर याच योजनेत ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक केली तर त्यांना 14 लाख 49 हजार 948 रुपये मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe