State Bank of India : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने अमृत लक्ष विशेष मुदत ठेव योजनेची वैधता पुन्हा एकदा वाढवली आहे. SBI च्या या विशेष मुदत ठेव योजनेमध्ये सामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज मिळते. SBI च्या अमृत कलश योजनेत आता 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ठेवी ठेवता येतील.
SBI च्या वेबसाइटनुसार, या योजनेतील गुंतवणुकीचा कालावधी किमान 400 दिवसांचा आहे ज्यामध्ये 7.10 टक्के व्याजदराचा लाभ मिळतो. हा व्याजदर 12 एप्रिल 2023 पासून लागू आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर 7.60 टक्के व्याजदर परतावा मिळतो. या योजनेत ग्राहकांना आणखी काय लाभ मिळतो चला जाणून घेऊया…

जर तुम्ही या योजनेमध्ये जमा केलेले पैसे 400 दिवसांपूर्वी काढले तर व्याजदर 0.50टक्के ते 1 टक्के पर्यंत कमी केला जाऊ शकतो. या योजनेंतर्गत, ठेवीदाराला मासिक, तीन महिने, सहा महिने, वार्षिक आणि पॉलिसीची मुदत पूर्ण होईपर्यंत व्याज खात्यात जमा करण्याची सुविधा दिली जात आहे. पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यावर, TDS कापून व्याज ग्राहकाच्या खात्यात जमा केले जाते.
SBI FD वर किती व्याजदर आहे?
सध्या, SBI सामान्य ग्राहकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर (FD) 3.5 टक्के ते 7 टक्के (अमृत कलश योजना वगळता) परतावा देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी FD वर 4 टक्के ते 7.50 टक्के व्याजदर आहे.













