SBI ची नवी SIP गरिबांना पण करणार श्रीमंत ! १ लाखांचे होतील ७८ लाखांहून जास्त पैसे…

Ratnakar Ashok Patil
Published:

SBI Mutual Fund : आजच्या काळात आर्थिक सुरक्षिततेसाठी गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक जण भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी बचत करण्याचा विचार करतात, मात्र मोठी रक्कम एकदम गुंतवणूक करणे अनेकांसाठी शक्य नसते. अशा परिस्थितीत, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या “जननिवेश SIP” योजनेद्वारे केवळ ₹२५० मासिक गुंतवणूक करून भविष्यात मोठा निधी जमा करता येतो. ही योजना विशेषतः ग्रामीण, निमशहरी तसेच शहरांमधील पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते.

SBI आणि SBI म्युच्युअल फंड यांनी मिळून सुरू केलेली ही जननिवेश SIP योजना लहान बचतीच्या माध्यमातून मोठा परतावा मिळवून देण्याचा उत्तम पर्याय आहे. ही योजना एक प्रकारची सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) आहे, जिच्यामध्ये अगदी कमी रक्कम गुंतवूनही भविष्यात मोठा निधी उभा करता येतो. यामध्ये गुंतवणूकदारांना दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे आपल्या आर्थिक गरजेनुसार गुंतवणुकीचे नियोजन करणे सोपे होते.

१७ लाखांचा मोठा निधी अगदी छोट्या बचतीतून

ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीवर आधारित आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा फक्त ₹२५० SIP मध्ये गुंतवले आणि यावर सरासरी १५% वार्षिक परतावा मिळाला, तर ३० वर्षांनंतर त्याच्याकडे तब्बल ₹१७.३० लाख रुपयांचा फंड तयार होऊ शकतो. यामध्ये त्याने जमा केलेली मूळ रक्कम फक्त ₹९०,००० असते, तर उर्वरित ₹१६.६२ लाख रुपये हे कंपाउंडिंगच्या जोरावर मिळणारे परतावे असतात.

याच SIP गुंतवणुकीचा कालावधी ४० वर्षांपर्यंत वाढवला तर परतावा आणखी वाढतो. उदाहरणार्थ, जर ४० वर्षांपर्यंत दरमहा ₹२५० SIP मध्ये गुंतवणूक सुरू ठेवली आणि यावर १५% परतावा मिळत राहिला, तर गुंतवणूकदाराकडे तब्बल ₹७८ लाखांहून अधिक रक्कम तयार होऊ शकते. या कालावधीत त्याने जमा केलेली मूळ रक्कम फक्त ₹१.२० लाख असते, मात्र कंपाउंडिंगच्या जोरावर त्याला मिळणारा परतावा तब्बल ₹७७.३० लाख रुपये इतका होतो.

SIP गुंतवणुकीचे फायदे आणि आकर्षक परतावा

SIP ही गुंतवणुकीची एक लोकप्रिय पद्धत आहे, कारण यात जोखीम नियंत्रित करता येते आणि दीर्घकालीन गुंतवणुकीतून मोठे फायदे मिळू शकतात. गेल्या काही दशकांतील आकडेवारीनुसार SIP मध्ये १२% ते १६% पर्यंत सरासरी परतावा मिळालेला आहे. SBI जननिवेश योजना विशेषतः इक्विटी आणि डेट फंडांचे संतुलित धोरण वापरून गुंतवणूक करते, त्यामुळे ही योजना बाजारातील अस्थिरतेपासून वाचवत दीर्घकालीन स्थिर परतावा देऊ शकते.

लहान गुंतवणूक, मोठा परतावा – आर्थिक स्वावलंबनाची दिशा

आजच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीत भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने बचतीला प्राधान्य द्यावे. विशेषतः निवृत्तीनंतर आर्थिक अडचणी येऊ नयेत म्हणून लहान वयातच SIP सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. SBI ची जननिवेश SIP योजना ही एक असा पर्याय आहे, जो अगदी कमी रकमेच्या गुंतवणुकीतून मोठा फंड उभारण्याची संधी देतो. यामुळे लहान बचतदार, शेतकरी, मध्यमवर्गीय नागरिक आणि नोकरी करणाऱ्या लोकांसाठी ही योजना अधिक फायद्याची ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe