SBI Scheme : एसबीआयची पैसे दुप्पट करणारी योजना ! गुंतवणूक करण्यास काहीच दिवस शिल्लक…

Published on -

SBI Scheme : तुम्ही स्वतःसाठी जोखीममुक्त गुंतवणूक शोधत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. सध्या भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक SBI ग्राहकांना सर्वोत्तम ऑफर देत आहे. SBI आपल्या ग्राहकांना खास ऑफर देत आहे. यामध्ये ग्राहकांचे पैसे काही वर्षांत दुप्पट होतात, तसेच पैसे सुरक्षित देखील राहतात. आम्ही SBI च्या WeCare FD योजनेबद्दल बोलत आहोत.

बँक कोणत्याही FD वर सामान्य ग्राहकापेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 0.50 अधिक व्याज देत आहे. SBI Wecare वर 7.50 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूक किमान 5 वर्षे आणि कमाल 10 वर्षांसाठी केली जाते. तुम्ही या योजनेत 5 लाख रुपये गुंतवल्यास, तुम्हाला थेट मॅच्युरिटीवर 10 लाख रुपये मिळतील.

SBI ने अलीकडेच घोषित केले की WeCare FD योजनेतील गुंतवणुकीची अंतिम मुदत 31 मार्च 2024 पर्यंत आहे. जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करून जास्त परतावा मिळवायचा असेल तर तुमच्याकडे आता काहीच दिवस शिल्लक आहेत.

सध्या, SBI बँक आपल्या ग्राहकांना WeCare FD वर 7.5 टक्के व्याज देत आहे. या व्याजदराने यातील पैसा 10 वर्षांत दुप्पट होईल. म्हणजेच, जर तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी 10 लाख रुपये मिळू शकतात. तुमची ही गुंतवणूक 10 वर्षात दुप्पट होईल. बँक नियमित10 वर्षांच्या एफडीवर 6.5 टक्के व्याज देत आहे. तसेच SBI त्यांच्या FD वर 3.50 टक्के ते 7.60 टक्के पर्यंत व्याज देत आहे.

तुम्ही SBI च्या WeCare स्पेशल FD स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला ७.५ टक्के दराने व्याज मिळते. SBI च्या या योजनेत ग्राहकांना नियमित FD पेक्षा 0.30 टक्के जास्त व्याज मिळते. जर तुम्ही या FD योजनेत सामील झालात तर तुम्हाला कर्जाची सुविधा देखील मिळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe