Engineering च्या विद्यार्थ्यांसाठी धमाकेदार संधी! 5200 विद्यार्थ्यांना मिळणार लाखोंची आर्थिक मदत

इंजिनिअरिंग आणि तंत्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदतर्फे ‘यशस्वी २५ – यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप’ योजना सुरू करण्यात आली आहे.

Published on -

Scholarship Scheme:- इंजिनिअरिंग आणि तंत्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदतर्फे ‘यशस्वी २५ – यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ५,२०० विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. ज्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शिष्यवृत्तीचे स्वरूप कसे आहे?

पदवी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ५०,००० रुपये शिष्यवृत्ती मिळेल.डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ३०,००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल.ही आर्थिक मदत पदवीसाठी चार वर्षे आणि डिप्लोमासाठी जास्तीत जास्त तीन वर्षांसाठी मिळेल.रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)’ द्वारे जमा केली जाईल.

अटी व निकष

विद्यार्थी AICTE मान्यता असलेल्या संस्थेत अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात शिकत असावा.कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे.

विद्यार्थ्याने पात्रता परीक्षेतील प्रवेश घेतल्यानंतर जास्तीत जास्त दोन वर्षांचे अंतर असावे.शिष्यवृत्ती केवळ मुख्य अभियांत्रिकी शाखांसाठीच लागू आहे.जर विद्यार्थी शाखा बदलली तर त्याला शिष्यवृत्ती रद्द होईल आणि संपूर्ण रक्कम परत करावी लागेल.

अर्ज प्रक्रिया आणि अंतिम तारीख

इच्छुक विद्यार्थ्यांनी AICTE च्या अधिकृत वेबसाईटवर १५ फेब्रुवारीपूर्वी ऑनलाईन अर्ज करावा.अर्जाची पडताळणी संस्थेकडून केली जाईल आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर केली जाईल.

विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!

ही योजना अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण चालू ठेवण्यासाठी आणि आर्थिक मदतीसाठी उत्तम संधी प्रदान करते. तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करुन या योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe