Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांची मजा…! ‘या’ 2 बँका एफडीवर देत आहेत भरघोस व्याज, बघा…

Content Team
Published:
Fixed Deposit

 Fixed Deposit : जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि एफडी मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आज आम्ही अशा काही बँका सांगणार आहोत, ज्या सध्या ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर सार्वधिक व्याजदर देत आहेत. या बँका 7.75% टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहेत.

या यादीमध्ये, बँक ऑफ बडोदा, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय, युनियन बँक ऑफ इंडिया सारख्या सार्वजनिक आणि खाजगी बँकांचा समावेश आहे. चला या बँकांचे एफडी वरील व्याजदर पाहूया…

या सर्व बँका ६० वर्षांवरील निवासी भारतीयांना सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहेत. तर काही बँका अति ज्येष्ठ नागरिकांना (80 वर्षे आणि त्याहून अधिक) सार्वधिक व्याजदर ऑफर करत आहेत.

अ‍ॅक्सिस बँक

Axis Bank ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या FD वर 7.60 टक्के व्याजदर देत आहे. म्हणजे आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.25 लाख रुपये होईल.

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदा बद्दल बोलायचे तर ते तीन वर्षांच्या FD वर 7.75 टक्के व्याज देत आहे. हे ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याजदर देते. म्हणजे आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत 1.26 लाख रुपये होईल.

एचडीएफसी बँक

HDFC बँक, ICICI बँक आणि पंजाब नॅशनल बँक तीन वर्षांच्या FD वर 7.50 टक्के व्याजदर देतात. यासह, आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत 1.25 लाख रुपये होईल.

स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या FD वर 7.25 टक्के व्याजदर देते. म्हणजेच आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.24 लाख रुपये होईल.

बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया तीन वर्षांच्या एफडीवर ७ टक्के व्याजदर देतात. आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.23 लाख रुपये होईल.

कॅनरा बँक

कॅनरा बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर ७.३० टक्के व्याज देते. या बँकेत आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.24 लाख रुपये होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe