Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांची जी काही बचत आहे, त्यावर त्यांना कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करायची नसते. त्यामुळे, ते त्यांची बचत मुदत ठेवींमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देतात, जेथे त्यांना हमी व्याज मिळू शकते आणि त्यांचे पैसेही सुरक्षित राहतात.
परंतु जर तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी पैसे जमा करायचे असतील तर SCSS म्हणजेच ज्येष्ठ नागरिक बचत योजना हा एक चांगला पर्याय असू शकतो. या योजनेत तुम्हाला 8.2 टक्के दराने व्याज दिले जात आहे. जे एफडी मध्ये मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा जास्त आहे.

आज आपण या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे फायदे आणि प्रमुख बँकांमध्ये 5 वर्षांच्या एफडीवर मिळणारे व्याजदर जाणून घेणार आहोत…
SCSS मध्ये 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. ठेवीची कमाल मर्यादा 30 लाख रुपये आहे. योजनेमध्ये, रक्कम 1000 च्या पटीत जमा केली जाते. त्याचा परिपक्वता कालावधी 5 वर्षांचा आहे.
ठेवीदाराची इच्छा असल्यास, तो ठेव रकमेच्या मुदतपूर्तीनंतर खात्याचा कालावधी तीन वर्षांपर्यंत वाढवू शकतो. हे मॅच्युरिटीच्या 1 वर्षाच्या आत वाढवता येते.
व गुंतवणूक करू शकतो?
60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करून नफा मिळवू शकते. व्हीआरएस घेणारे नागरी क्षेत्रातील सरकारी कर्मचारी आणि संरक्षणातून निवृत्त होणाऱ्या लोकांना काही अटींसह वयात सवलत दिली जाते. हे खाते जोडीदारासह एकल किंवा संयुक्त खाते उघडता येते. कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ SCSS मध्ये उपलब्ध आहे.
किती गुंतवणुकीवर तुम्हाला किती फायदा मिळेल?
जर तुम्ही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले तर 5 वर्षानंतर तुम्हाला एकूण 1,41,000 रुपये मिळतील. 2 लाख रुपये गुंतवून तुम्हाला 2,82,000 रुपये मिळतील, 5 लाख रुपये गुंतवून तुम्हाला 7,05,000 रुपये मिळतील. 10 लाख रुपये जमा केल्यावर तुम्हाला 14,10,000 रुपये मिळतील. 20 लाख रुपये जमा केल्यावर तुम्हाला 28,20,000 रुपये आणि 30 लाख रुपये जमा केल्यावर तुम्हाला 42,30,000 रुपये मिळतील.
5 वर्षाच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना बँकेत मिळणारे व्याजदर
SBI : 7.25 टक्के, PNB : 7:00 टक्के, HDFC : 7:50 टक्के, ICICI : 7:50 टक्के, Axis : 7:60 टक्के.