Senior Citizens Scheme : ज्येष्ठ नागरिकांसाठी घरबसल्या कमाईची संधी! ‘या’ योजनेत मिळत आहे भरघोस व्याज, वाचा सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:
Senior Citizens Scheme

Senior Citizens Scheme : केंद्र सरकारकडून आता नुकतेच पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता या योजनेवर 8.2 टक्के इतके वार्षिक व्याज दिले जात आहे.

समजा तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला तुमचे पैसे अशा ठिकाणी गुंतवायचे आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पैशावर जबरदस्त परतावा मिळेल . इतकेच नाही तर तुम्ही गुंतवलेले पैसेही सुरक्षित असतील, तर तुम्ही पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करू शकता. कारण या ठिकाणी तुम्ही चांगली कमाई करू शकता.

या ठिकाणी चालू करा खाते

60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक योजनेत गुंतवणूक करणे खूप फायदेशीर आहे. तसेच तुम्ही तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत खाते चालू करून चांगले व्याज मिळवू शकता.

परतावा

या योजनेत, तुम्हाला वार्षिक 8.2 % हमी परतावा मिळेल. इतकेच नाही तर आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत आयकर कपातीचा लाभ मिळेल. एप्रिलमध्ये केंद्र सरकारकडून छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली होती. या दरम्यान ज्येष्ठ नागरिक बचत योजनांचा व्याजदर 8.2 टक्के केला आहे.

जाणून घ्या परिपक्वता कालावधी

या योजनेचा परिपक्वता कालावधी 5 वर्षे असून तुम्ही 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, हे खाते 3 वर्षांसाठी वाढवू शकता. तुम्हाला या योजनेअंतर्गत चालू केलेले खाते योजनेचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत वाढवता येते.

किती मिळतात नॉमिनीला पैसे?

ज्या व्यक्तीच्या नावाने या योजनेत खाते उघडले आहे ती व्यक्ती समजा खात्याची मुदत पूर्ण होण्याआधीच मरण पावल्यास ज्या व्यक्तीचे नाव नॉमिनी म्हणून खात्यात टाकून ती व्यक्ती संपूर्ण पैसे मिळवण्याचा हक्कदार असते. तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला तुमच्या खात्यात नामनिर्देशित करू शकता, परंतु हे लक्षात ठेवा की खात्यात परदेशी नागरिकाचे नामांकन करता येत नाही. पत्नी किंवा पतीला नॉमिनी बनवण्याचा एक फायदा असून मुख्य खातेदाराच्या मृत्यूनंतरही, खाते परिपक्वतेपर्यंत चालू ठेवता येते.

असे चालू करा खाते

1. तुम्हाला खाते चालू करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागणार आहे.
2. तुम्हाला त्यासाठी एक फॉर्म घ्यावा लागणार आहे.
3. अर्ज घेतल्यानंतर, तुम्हाला फॉर्ममध्ये मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक वाचून प्रविष्ट करावी लागतील.
4. तुम्हाला KYC कागदपत्रांच्या फोटो कॉपीसह फॉर्म जोडून त्यात तुम्हाला ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, वयाचा पुरावा आणि पासपोर्ट आकाराचे दोन फोटो द्यावे लागणार आहेत.
5. सर्व माहिती भरून तुम्हाला तो सबमिट करावा लागेल.
6. या प्रकारे तुम्ही ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत खाते उघडू शकता आणि लाभ घेऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe