September Bank Holiday : ऑगस्ट महिन्याची लवकरच सांगता होणार अन सप्टेंबरला सुरुवात होणार आहे. अशातच बँक खातेधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर पुढील सप्टेंबर महिन्यात अनेक मोठमोठे सण साजरे होणार आहेत. गौरी गणपतीसह अनेक सण पुढल्या महिन्यात साजरे केले जाणार आहेत.
त्यामुळे पुढल्या महिन्यात बँकांना खूपच अधिक सुट्ट्या राहणार आहेत. रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने सप्टेंबर महिन्यात बँकांना किती दिवस सुट्ट्या राहणार याबाबत मोठी माहिती दिली आहे. आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये तब्बल अर्धा महिना बँका बंद राहणार आहेत.
म्हणजेच पंधरा दिवस बँकांना सुट्टी राहणार आहे. मात्र वेगवेगळ्या राज्यात सुट्ट्यांचा कालावधी कमी अधिक राहणार आहे. म्हणजेच राज्यानुसार सुट्ट्यांची यादी बदलणार आहे. अर्थातच सर्वत्र पंधरा दिवस बँका बंद राहणार नाहीत.
तथापि पुढल्या महिन्यात जर तुम्हाला बँकेत जाऊन काही काम करायचे असेल तर या सुट्ट्या पाहूनच तुमच्या कामाचे नियोजन करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण सप्टेंबर महिन्यातील सुट्ट्यांची संपूर्ण यादी अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सप्टेंबर महिन्यातील बँकेच्या सुट्ट्या खालीलप्रमाणे
1 सप्टेंबर : रविवार असल्याने या दिवशी संपूर्ण देशात बँका बंद राहणार आहेत.
4 सप्टेंबर : श्रीमंत शंकरदेवाची तिरुभव तिथी असल्याने या दिवशी गुवाहाटीमध्ये बँका बंद राहणार आहेत.
7 सप्टेंबर : गणेश चतुर्थी असल्याने संपूर्ण भारतात बँका बंद राहणार आहेत.
8 सप्टेंबर : रविवार असल्याने संपूर्ण देशात बँकांना सुट्टी राहणार आहे.
14 सप्टेंबर: दुसरा शनिवार असल्याने संपूर्ण भारतात या दिवशी सुट्टी राहणार आहे.
15 सप्टेंबर : रविवार असल्याने या दिवशी संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी राहणार आहे.
16 सप्टेंबर : बारावाफट निमित्ताने जवळपास संपूर्ण भारतातील बँकांना सुट्टी राहणार आहे.
17 सप्टेंबर : मिलाद-उन-नबी निमित्ताने गंगटोक, रायपूर येथील बँकांना सुट्टी राहणार आहे.
18 सप्टेंबर : पंग-लाहबसोल निमित्ताने गंगटोक येथील बँकांना सुट्टी राहणार आहे.
20 सप्टेंबर : ईद-ए-मिलाद-उल-नबी निमित्ताने जम्मू-काश्मीरमधील बँकांना सुट्टी राहणार आहे.
21 सप्टेंबर: श्री नारायण गुरु समाधी दिवस निमित्ताने कोची, तिरुवनंतपुरम येथे बँकांना सुट्टी राहणार आहे.
22 सप्टेंबर : साप्ताहिक सुट्टी अर्थातच रविवार असल्याने संपूर्ण देशात बँकांना सुट्टी राहणार आहे.
23 सप्टेंबर : महाराजा हरिसिंह यांचा जन्मदिन असल्याने जम्मू, श्रीनगर येथील बँकांना सुट्टी राहील.
28 सप्टेंबर : चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी राहणार आहे.
29 सप्टेंबर : रविवार असल्याने या दिवशी देशातील सर्वच बँकांना सुट्टी राहणार आहे.