गुंतवणूकदारांना पैसे कमवण्याची संधी! शेअर मार्केटच्या पडझडीत लॉंग टर्मसाठी खरेदी करा ‘हे’ 5 शेअर्स; भरपूर कमवाल पैसा

सध्या शेअर मार्केटची जर स्थिती बघितली तर त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात चढउतार दिसून येत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून जो काही विक्रीचा सपाटा लावलेला आहे त्यामुळे देखील बाजारात विक्रीचा खूप मोठा दबाव असल्यामुळे त्याचा परिणाम हा शेअर मार्केटवर दिसून येत आहे.

share market

Share For Long Term:- सध्या शेअर मार्केटची जर स्थिती बघितली तर त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात चढउतार दिसून येत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून जो काही विक्रीचा सपाटा लावलेला आहे त्यामुळे देखील बाजारात विक्रीचा खूप मोठा दबाव असल्यामुळे त्याचा परिणाम हा शेअर मार्केटवर दिसून येत आहे.

त्यामुळे गुंतवणूकदार देखील खूप गोंधळात असून नेमकी गुंतवणुकीची स्ट्रॅटेजी कोणत्या पद्धतीची असावी याबाबत संभ्रमात असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत.

परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये शॉर्ट टर्म व मध्यम कालावधीच्या गुंतवणुकीसाठी हा कालावधी तितकासा चांगला नसल्याचे बोलले जात असताना मात्र दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगली संधी या कालावधीत असल्याचे देखील गुंतवणूक तज्ञांचे मत आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर मीराई ॲसेट शेअरखानने बारा महिने कालावधीसाठी काही शेअरची निवड केलेली आहे व या बारा महिन्याच्या कालावधीत हे शेअर्स 48 टक्क्यांपर्यंत वाढतील असे एक टार्गेट देण्यात आलेले आहे. त्या नेमके शेअर कोणते आहेत याबद्दल आपण थोडक्यात बघू.

बारा महिने कालावधीत गुंतवणुकीसाठी फायद्याचे शेअर्स

1- टीसीएस- सध्या हा शेअर 4145 रुपयांवर ट्रेड करत असून त्यासाठी बाय रेटिंग देण्यात आलेली आहे. या शेअर करिता 5230 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे व ते सध्याच्या किमतीपेक्षा जवळपास 26 टक्के जास्त आहे. गेल्या 52 आठवड्याचा जर उच्चांक बघितला तर तो 4585 इतका आहे व नीचांक 3593 रुपये आहे.

2- आयसीआयसीआय बँक- सध्या आयसीआयसीआय बँकेचा शेअर 1202 रुपयांवर ट्रेड करत असून याकरिता देखील बाय रेटिंग देण्यात आली आहे. 1550 रुपयांचे टार्गेट देण्यात आले असून जे सध्याच्या किमतीपेक्षा 29 टक्क्यांनी जास्त आहे. आयसीआयसीआय बँकेचा शेअरची 52 आठवड्याचा उच्चांक बघितला तर तो 1361 व नीचांक 985 रुपये आहे.

3- ओबेरॉय रिअल्टी- हा शेअर सध्या १८२२ रुपयांवर ट्रेड करत असून याकरिता देखील बाय कॉल देण्यात आला असून याकरिता टार्गेट प्राईस २६९४ रुपये इतकी देण्यात आली आहे व जे सध्याच्या किमतीपेक्षा 48 टक्के जास्त आहे.

4- गोदरेज कंजूमर- गोदरेज कंजूमरचा शेअर सध्या ११४५ रुपयांवर ट्रेड करत असून याकरिता देखील बाय रेटिंग देण्यात आली आहे. तज्ञाच्या माध्यमातून याकरिता १६७५ रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे.

जे सध्याच्या किमतीपेक्षा 46 टक्के जास्त आहे. जर आपण गेल्या आठवड्यातील या शेअरची कामगिरी बघितली तर त्याचा उच्चांक 1541 रुपये आणि नीचांक 1055 रुपये आहे.

5- वरूण बेव्हरेजेस- सध्या हा शेअर 540 रुपयांवर ट्रेड करत असून याकरता देखील बाय कॉल देण्यात आला आहे. यासाठी टार्गेट प्राईस 750 रुपयांचे देण्यात आले असून जे सध्याच्या किमती पेक्षा 39 टक्के जास्त आहे. या शेअरचा गेल्या 52 आठवड्याचा परफॉर्मन्स बघितला तर त्याचा उच्चांक 682 रुपये तर नीचांक 488 रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe