Share Market Dividend : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा विशेष कामाचा ठरणार आहे. ह्या आठवड्यात गुंतवणूकदारांना शेअर मार्केट मधील काही कंपन्या कमाईची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या आठवड्यात एक लोकप्रिय महारत्न कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वितरित करणार आहे.
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील महारत्न कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने लाभांश वितरित करण्याची मोठी घोषणा केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की अलीकडेच कंपनीच्या संचालक मंडळाची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली.

12 डिसेंबर 2025 रोजी कंपनीची हे महत्त्वाची बैठक संपन्न झाली यामध्ये कंपनीच्या संचालक मंडळाने गुंतवणूकदारांना पाच रुपयांचा लाभांश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या या दिग्गज कंपनीचा या आर्थिक वर्षातील हा पहिलाच अंतरिम लाभांश असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान कंपनीच्या घोषणेनंतर याच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली असून कंपनीचे स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आले आहेत. 12 डिसेंबरला संपन्न झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गुंतवणूकदारांना 50% अंतरिम लाभांश देण्यास मंजुरी देण्यात आली असून तेव्हापासून या कंपनीची जोरदार चर्चा सुरू आहे.
या निर्णयानुसार इंडियन ऑइल आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक पात्र शेअर्समागे पाच रुपयांचा लाभांश देणार आहे. महत्वाची बाब म्हणजे कंपनीने अलीकडेच बोनस शेअर जाहीर केले होते आणि आता लाभांश देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
यामुळे कंपनीत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, लॉंग टर्मसाठी इन्वेस्टमेंट केलेल्या गुंतवणूकदारांमध्ये देखील सकारात्मक वातावरण पाहायला मिळतोय. दरम्यान आता आपण लाभांशसाठी कंपनीने काय रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे याची माहिती पाहणार आहोत.
रेकॉर्ड तारीख कोणती?
लाभांशासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख पण फायनल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुंतवणूकदारांना या आठवड्यातच कंपनीकडून लाभांश दिला जाणार आहे. कंपनीने याची रेकॉर्ड डेट 18 डिसेंबर 2025 निश्चित केली आहे.
याचा अर्थ, या तारखेपर्यंत इंडियन ऑइलचे शेअर्स ज्यांच्या नावावर असतील, त्या गुंतवणूकदारांना लाभांश वितरित करण्यात येणार आहे. यामुळे ज्या गुंतवणूकदारांना कंपनीच्या लाभांशाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी या तारखेच्या आधीच शेअर्स खरेदी करणे आवश्यक आहे.
दरम्यान कंपनीने पात्र गुंतवणूकदारांना 11 जानेवारी 2026 च्या आधी लाभांशाची रक्कम दिली जाईल अशी मोठी माहिती दिलेली आहे. कंपनीने ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. या मुदतीत गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्याशी लिंक असणाऱ्या बँक अकाउंट मध्ये लाभांशाची रक्कम जमा होणार आहे..शुक्रवारी इंडियन ऑइलचा शेअर बीएसईवर 163.60 रुपयांवर बंद झाला.













