Share Market Holiday News : 2026 सुरु होण्यासाठी आता फक्त काही दिवसांचा काळ शिल्लक आहे. येत्या 18 दिवसात नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे आणि यामुळे सगळीकडेच उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, नवीन वर्ष सुरू होण्याआधीच शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी एक कामाची बातमी समोर आली आहे.
तुम्ही पण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुम्ही नक्कीच वाचायला हवी. खरंतर, नव्या वर्षात शेअर मार्केटला किती दिवस सुट्ट्या राहणार हा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता आणि अखेरकार आता या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात एनएसईकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ने 2026 मधील शेअर मार्केटच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे जर तुम्हीही स्टॉक एक्सचेंज गुंतवणूकदार असाल तर ही सुट्ट्यांची यादी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
2026 मध्ये शेअर मार्केट कोणकोणत्या तारखांना बंद राहणार ?
नॅशनल स्टॉक एक्सचेंज कडून प्राप्त माहितीनुसार, 2026 मध्ये जवळपास 15 दिवस प्रमुख सण उत्सव निमित्ताने शेअर मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे.
26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन निमित्ताने या दिवशी सोमवार असताना ही शेअर मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे.
3 मार्च : या दिवशी होळी असल्याने शेअर मार्केट बंद राहील.
26 मार्च : श्रीराम नवमी निमित्ताने शेअर मार्केट या दिवशी बंद राहणार आहे.
31 मार्च : महावीर जयंती निमित्ताने या दिवशी शेअर मार्केट बंद राहणार आहे.
तीन एप्रिल : गुड फ्रायडे निमित्ताने या दिवशी शेअर मार्केट बंद राहणार आहे.
14 एप्रिल : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्ताने या दिवशी शेअर मार्केट बंद ठेवले जाईल.
1 मे : महाराष्ट्र दिन निमित्ताने या दिवशी शेअर मार्केट बंद राहणार आहे.
28 मे : बकरी ईद असल्याने या दिवशी शेअर मार्केट बंद ठेवले जाईल.
26 जून : मोहरम असल्याने Share Market बंद असणार आहे.
14 सप्टेंबर : गणेश चतुर्थी या दिवशी शेअर मार्केट बंद राहणार आहे.
2 ऑक्टोबर : शुक्रवार असतांनाही महात्मा गांधी जयंती निमित्ताने या दिवशी शेअर मार्केट बंद राहणार आहे.
20 ऑक्टोबर : विजयादशमी असल्याने या दिवशी शेअर मार्केट बंद राहणार आहे.
10 नोव्हेंबर : दिवाळी बलिप्रतिपदा असल्याने या दिवशी शेअर मार्केट बंद राहणार आहे.
24 नोव्हेंबर : श्री गुरुनानक जयंती निमित्ताने शेअर मार्केट बंद राहणार आहे.
25 डिसेंबर : ख्रिसमस असल्याने या दिवशी शेअर मार्केट बंद राहणार आहे.













