Share Market Investment: शेअर मार्केट गुंतवणुकीतून लाखोत फायदा मिळवायचाय? ‘हे’ क्षेत्र ठरेल फायद्याचे… बघा कारणे

Published on -

Share Market Investment:- शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा कल हा दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे. जरी या ठिकाणी गुंतवणुकीमध्ये जोखीम असली तरी देखील गुंतवणुकीचा ट्रेंड हा वाढत आहे. शेअर मार्केटमध्ये आपल्याला बँकिंग तसेच एएफएमसीजी आणि आयटी क्षेत्रातील अनेक कंपन्या दिसतात व यामध्ये अनेक गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. आतापर्यंत जर आपण आकडेवारी बघितली तर आयटी कंपन्यांपासून तर बँकिंग तसेच एफएमसीजी क्षेत्राने गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिलेला आहे.

परंतु आता त्याहीपेक्षा जास्त फोकसमध्ये आहे ते सौर ऊर्जा क्षेत्र होय. कारण सध्या सौर ऊर्जा वापरायला प्रोत्साहन दिले जात असल्यामुळे गुंतवणूकदारांनी सौरक्षेत्रावर फोकस करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ होत असून गुंतवणूक तज्ञांच्या सल्ल्याने जर या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली तर नक्कीच गुंतवणूकदारांना चांगला परतावा या माध्यमातून मिळू शकतो.

सौर ऊर्जा क्षेत्रामधील जलद वाढीची नेमकी कारणे काय?

जर आपण भारताच्या दृष्टिकोनातून बघितले तर सध्या विजेची मागणी भारतात खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे व ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सौर ऊर्जा हा एक विश्वासहार्य पर्याय ठरताना दिसून येत आहे. त्यामुळे साहजिकच सौर कंपन्यांसाठी मोठी संधी या माध्यमातून निर्माण झाल्याने या क्षेत्रातील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. तसेच या क्षेत्रासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील प्रोत्साहन दिले जात आहे व सरकारच्या पाठिंबामुळे सौरऊर्जा क्षेत्राला स्थिरता मिळताना दिसून येत आहे.

सरकारच्या माध्यमातून या क्षेत्रातील कंपन्यांना अनुदान आणि करात लाभ मिळत असून त्यामुळे या कंपन्यांची विक्री आणि नफ्यात वाढ होताना दिसून येत आहे. या क्षेत्रात अनेक तांत्रिक प्रगती झाल्यामुळे सौर पॅनल स्वस्त आणि अधिक कार्यक्षम झाले आहेत व कंपन्यांचा खर्च यामुळे कमी झाला असून नफा मिळण्यास मदत झालेली आहे. परंतु या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर कंपन्यांची आर्थिक स्थिती तसेच कर्ज पातळी आणि रोख प्रवाह तपासणे गरजेचे आहे. तसेच या कंपन्यांची ऑर्डर बुक आणि चालू असलेले त्यांचे प्रकल्प यांचा अभ्यास करावा व चढउतार होत असतील तर घाबरून न जाता दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय स्वीकारावा. या बाबतीत सरकारी धोरणे आणि होत असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडी यावर लक्ष ठेवून गुंतवणुकीची प्लॅनिंग करावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News