Share Market IPO: बाजारात आला धमाकेदार आयपीओ!1.2 लाखांची गुंतवणूक….लॉट साइज ऐकून धक्का बसेल

Published on -

Share Market IPO:- आज शेअर बाजारात एक नवीन नाव चर्चेत आलंय व ते म्हणजे जैनिक पॉवर अँड केबल्स हे होय. कंपनीने आपला प्राथमिक समभाग विक्रीचा कार्यक्रम, म्हणजेच आयपीओ, आजपासून गुंतवणूकदारांसाठी खुला केला आहे. बाजारात उत्सुकतेची लाट असताना, दुसरीकडे ग्रे मार्केटमधून काहीसं गोंधळात टाकणारं चित्रही समोर येतंय.

कशी आहे या IPO ची लॉट साईज?

कंपनीचा हा आयपीओ १० जूनपासून सुरू झाला असून १२ जूनपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला राहणार आहे. म्हणजे, गुंतवणूकदारांकडे तीन दिवसांचा वेळ आहे आपली बोली लावण्यासाठी. जैनिक पॉवर अँड केबल्सने शेअर्ससाठी किंमत पट्टा १०० ते ११० रुपयांदरम्यान ठरवला आहे. म्हणजे, गुंतवणूकदारांना याच किंमतीच्या मर्यादेत आपली रक्कम गुंतवावी लागेल. लॉट साइज १२०० शेअर्सची असून, किरकोळ गुंतवणूकदाराला किमान १,२०,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ही रक्कम काहीशी जास्त वाटू शकते, त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी निर्णय काळजीपूर्वक घ्यावा.

कंपनीचे उद्दिष्ट काय?

आता जर कंपनीच्या उद्दिष्टांकडे पाहिलं, तर हा आयपीओ पूर्णतः नवीन शेअर्सवर आधारित आहे. म्हणजेच, बाजारातून जे पैसे उभे राहतील, ते थेट कंपनीच्या उपक्रमांमध्ये वापरण्यात येणार आहेत. जैनिक पॉवर अँड केबल्स एकूण ५१.३० कोटी रुपयांचा निधी उभारणार असून त्यासाठी ४६.६३ लाख नवीन शेअर्स जारी केले जातील. याचे सूचीकरण एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर होणार आहे – म्हणजे मोठ्या एक्सचेंजवर नाही, पण खास लघु व मध्यम उद्योगांसाठी असलेल्या एक्सचेंजवर.

इश्यूतील शेअर्सचे वाटप कसे होईल?

या इश्यूतील शेअर्सचे वाटप सुद्धा ठरावीक पद्धतीने होणार आहे. अर्धा हिस्सा, म्हणजे ५० टक्के, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर ३५ टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि उरलेले १५ टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (ज्यांना आपण NII म्हणतो) राखीव असणार आहे.

पण या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे व ती म्हणजे ग्रे मार्केटमधील स्थिती. सध्या या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये कुठलाही प्रीमियम मिळत नाहीये. म्हणजेच, बाजारात तो सध्या “झिरो प्रीमियम”वर ट्रेड होतोय. हे पाहता सुरुवातीचं लिस्टिंग फार चमकदार होईल असं चित्र नाही. मात्र, एक दिलासादायक बाब म्हणजे या आयपीओचे शेअर्स कोणत्याही सवलतीच्या दराने उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेअर्सची किंमत खाली घसरण्याची शक्यता कमी आहे आणि त्यातून काही प्रमाणात सकारात्मक लिस्टिंगची आशाही बाळगता येईल.

या आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून फास्ट ट्रॅक फिनसेक प्रायव्हेट लिमिटेडची निवड करण्यात आली आहे. तर रजिस्ट्रार म्हणून स्कायलाइन फायनान्शियल सर्व्हिसेस काम पाहणार आहेत. कंपनीचं उत्पादन क्षेत्रात बरंचसा अनुभव आहे. ती गेल्या दशकभर अॅल्युमिनियम रॉडसारख्या उत्पादने तयार करते. विशेषतः, २०२३ पासून यामध्ये अधिक सुसूत्रता आणली गेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe