5 वर्षात 2500 टक्के रिटर्न ! ‘हा’ स्टॉक आता पुन्हा गुंतवणूकदारांना बनवणार करोडपती, सलग तिसऱ्या दिवशी अप्पर सर्किट

Published on -

Share Market News : शेअर बाजारात शुक्रवारी स्पाइस लाउंज फूड वर्क्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये सलग तिसऱ्या दिवशी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली.

जोरदार खरेदीमुळे या स्मॉल-कॅप स्टॉकला पुन्हा एकदा ५ टक्क्यांचे अपर सर्किट लागले असून, बीएसईवर हा शेअर ३१.२५ रुपयांवर पोहोचला.

गेल्या काही सत्रांतील मोठ्या घसरणीनंतर आता या शेअरमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याचे चित्र दिसत आहे. अवघ्या तीन दिवसांतच या स्टॉकमध्ये १५ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढला आहे.

गेल्या पाच व्यापारी सत्रांमध्ये झालेल्या तीव्र घसरणीनंतर स्पाइस लाउंज फूड वर्क्सच्या शेअर्सनी जोरदार पुनरागमन केले आहे. या तेजीमागे कंपनीची एक महत्त्वाची व्यावसायिक घोषणा कारणीभूत ठरत असल्याचे बाजार तज्ज्ञांचे मत आहे.

कंपनीने आपल्या लाइव्ह कल्चर आणि एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म ‘XORA वर्ल्ड’अंतर्गत प्रसिद्ध संगीतकार हॅरिस जयराज यांच्या कॉन्सर्टचे हैदराबादमध्ये पहिल्यांदाच आयोजन करण्याची घोषणा केली आहे. हा बहुप्रतीक्षित कॉन्सर्ट २६ एप्रिल २०२६ रोजी पार पडणार आहे.

कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, XORA वर्ल्ड हे राइटफेस्टचे प्रॉपराइटरी प्लॅटफॉर्म असून ते पूर्णतः स्पाइस लाउंज फूड वर्क्स समूहाच्या मालकीचे आहे.

तिकीट आधारित लाइव्ह एंटरटेनमेंट हा एक स्वतंत्र आणि मोठा व्यवसाय म्हणून उभारण्याचा कंपनीचा मानस असून, यामुळे त्यांच्या इतर ग्राहक-केंद्रित व्यवसायांनाही चालना मिळेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

यापूर्वी २८ मार्च २०२६ रोजी हैदराबादच्या गाचीबोवली स्टेडियमवर महान संगीतकार इलैयाराजा यांच्या ५० वर्षांच्या सांगीतिक प्रवासाचा उत्सव साजरा करणाऱ्या भव्य कार्यक्रमाची घोषणाही कंपनीने केली होती.

शेअरच्या कामगिरीचा विचार केला असता, अल्प मुदतीत या स्टॉकमध्ये मोठी अस्थिरता दिसून आली आहे. एका महिन्यात सुमारे २५ टक्के, तर तीन महिन्यांत जवळपास ४० टक्क्यांची घसरण झाली आहे.

सहा महिन्यांत हा शेअर २३ टक्क्यांहून अधिक घसरला असला, तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा स्टॉक मल्टीबॅगर ठरला आहे. एका वर्षात १२५ टक्के, तीन वर्षांत सुमारे ६५० टक्के आणि पाच वर्षांत तब्बल २५०० टक्क्यांचा परतावा या शेअरने दिला आहे. त्यामुळेच सध्याची तेजी गुंतवणूकदारांचे लक्ष पुन्हा या शेअरकडे वेधून घेत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News