शेअर मार्केट मधून कमाईची सुवर्णसंधी ! ‘या’ 5 स्टॉक्स मधून गुंतवणूकदारांना मिळणार जबरदस्त परतावा, 42% रिटर्न देणारे शेअर्स

Published on -

Share Market News : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजची ही बातमी खास राहणार आहे. आज आपण शेअर मार्केट मधील अशा काही स्टॉक बाबत माहिती पाहणार आहोत जे की येत्या बारा महिन्यांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 42 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न देण्याची क्षमता ठेवतात.

शेअर बाजार तज्ज्ञांनी एकमताने केलेल्या अंदाजानुसार मिड-कॅप सेगमेंटमधील काही शेअर्स पुढील बारा महिन्यांमध्ये चांगला दमदार परतावा देणार आहेत. यामुळे शेअर बाजार तज्ञांनी या स्टॉकसाठी बाय रेटिंग जाहीर केली आहे.

‘हे’ स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार श्रीमंत

Crompton Greaves – या स्टॉकची करंट मार्केट प्राइस 283 रुपये आहे आणि या स्टॉकसाठी 401 रुपयांची टार्गेट प्राईज सेट करण्यात आली आहे. म्हणजेच या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना पुढील 12 महिन्यांच्या काळात 42 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात असा तज्ञांचा अंदाज आहे.

Clean Science – या स्टॉकची करंट मार्केट प्राइस एक हजार नऊ रुपये आहे. परंतु हा स्टॉक पुढील बारा महिन्यांच्या काळात 1421 रुपयांपर्यंत वाढू शकतो असा अंदाज आहे. म्हणजेच पुढील एका वर्षाच्या काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना 41% रिटर्न देण्याची क्षमता ठेवतो. 

Brainbees Solutions – या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना पुढील बारा महिन्यांच्या काळात 33% पर्यंत रिटर्न मिळू शकतात असा अंदाज शेअर मार्केट मधील तज्ञांनी व्यक्त केला आहे. या स्टॉकची करंट मार्केट प्राइस 348 रुपये आहे परंतु यासाठी 462 रुपयांची टारगेट प्राईस सेट करण्यात आली आहे. 

Kalyan Jewellers – या स्टॉक मधूनही गुंतवणूकदारांना येत्या काळात 32% पर्यंत रिटर्न मिळू शकतात. पुढील बारा महिन्यांच्या काळात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना चांगली कमाई होणार असा अंदाज आहे. या स्टॉकची करंट मार्केट प्राइस 510 रुपये आहे आणि यासाठी 673 रुपयांची टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आली आहे.

Emami – या स्टॉक मधून येत्या काळात 31 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळतील असा अंदाज आहे. सध्या या स्टॉकची करंट मार्केट प्राइस 534 रुपये आहे. या स्टॉक साठी 703 रुपयांची टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News