गुंतवणूकदार झालेत मालामाल; 6 वर्षात दिलेत 5 हजार 300 टक्के रिटर्न, अभिनेते अजय देवगनकडे आहेत पाच लाख शेअर्स

Published on -

Share Market News : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. तुम्ही पण मार्केटमध्ये पैसा गुंतवण्याचा तयारीत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. खरंतर गेल्या पाच सहा वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून येत आहे.

मार्केट कधी फारच मोठा विक्रम तयार करते तर कधी मार्केटमध्ये मोठा दबाव पाहायला मिळतो. मार्केटमध्ये होणारी ही चढ-उतार गुंतवणूकदारांना मात्र मोठे अस्वस्थ करणारी आहे. पण या चढ उताराच्या काळातही शेअर मार्केट मधील काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा कमवून देत आहेत आणि आज आपण अशाच एका कंपनीची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत.

आज आपण ज्या कंपनीची माहिती पाहणार आहोत त्यात सिने अभिनेते अजय देवगन यांची सुद्धा मोठी गुंतवणूक आहे. चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून दिला आहे.

मागील पाच सहा वर्षाच्या काळात या कंपनीत इन्वेस्ट करणाऱ्या गुंतवणूकदारांना हजारो टक्के रिटर्न मिळाले आहेत. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 5% ने वाढलेत.

शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 43 रुपयांच्या आसपास व्यवहार करत होते. दरम्यान मार्च 2019 पासून आतापर्यंत म्हणजेच जवळपास सहा साडेसहा वर्षांच्या काळात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 5300 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न दिले आहेत.

बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगन यांच्याकडे या कंपनीचे दहा लाख शेअर्स असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब अशी की या कंपनीने अलीकडेच आपल्या गुंतवणूकदारांना 5 बोनस शेअरचे वाटप सुद्धा केले आहे. या कंपनीत अजय देवगणचा 1.41% इतका हिस्सा आहे. पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनलच्या शेअर्समध्ये मार्च 1

2019 पासून 5375% इतकी वाढ झाली आहे. या कंपनीचे शेअर्स मार्च 2019 मध्ये 0.79 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करत होता. डिसेंबर 2025 मध्ये कंपनीचे शेअर्स 43 ते 44 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करत आहेत. मागील सहा वर्षांच्या काळात या कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 2460% वाढ झाली आहे.

मागील पाच वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 1490% वाढ झाली आहे. कंपनीने अलीकडेच दोन शेअर्सच्या बदल्यात पाच फ्री शेअर्स दिले आहेत. अर्थात कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 5:2 च्या प्रमाणात शेअरचे वाटप केले आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News