15 दिवसात 200 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न! आता मागील 7 दिवसांपासून सतत घसरतोय ‘हा’ शेअर, कारण काय?

Published on -

Share Market News : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. तज्ञांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना नेहमीच लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.

कारण लॉंग टर्म मध्ये गुंतवणूकदारांना शेअर्समधून चांगली कमाई होते. पण काही वेळा असही होत की काही शेअर्स शॉर्ट टर्म मध्ये देखील आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देतात आणि असाच एक स्टॉक सध्या चर्चेत आहे.

या स्टॉकने गेल्या काही दिवसांपूर्वी अवघ्या पंधरा दिवसांच्या काळात गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न दिले होते. मात्र मागील सात दिवसांची या स्टॉकची कामगिरी निराशा जनक राहिली आहे आणि यामुळे गुंतवणूकदारांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे.

टीसीआय फायनान्स या नॉन बँकिंग फायनान्शिअल शेअर्समध्ये मागील आठवड्याभरापासून सातत्याने घसरन सुरू आहे. या शेअर्सला सलग सातव्या दिवशी लोअर सर्किट लागले आहे.

यामुळे साहजिकच गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. पण या नुकसानीच्या आधी या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिले होते.

सात दिवसांपूर्वी या कंपनीचे शेअर्स सलग 17 दिवस तेजीत राहिलेत. या कालावधीत या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना तब्बल 227% इतके रिटर्न दिलेत.

पण आता या स्टॉक मध्ये जबरदस्त घसरण सुरू असून आज आपण या शेअर्सची मागील तीन वर्षांची शेअर मार्केट मधील कामगिरी जाणून घेणार आहोत.

15 डिसेंबर 2025 नंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये खऱ्या अर्थाने तेजी सुरू झाली. त्यानंतर आठ जानेवारीपर्यंत हा स्टॉक तेजित राहिला मात्र आता यात सतत घसरण होत आहे आणि यामुळे गुंतवणूकदार चिंतेत सापडले आहेत.

15 डिसेंबर ते आठ जानेवारी 2026 या कालावधीत या कंपनीच्या शेअर्समध्ये 227 टक्के वाढ झाली. या काळात अकरा रुपयांचा स्टॉक थेट 36 रुपयांवर पोहोचला. मागील तीन महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 130% इतके रिटर्न दिले आहेत.

तसेच मागील दोन वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये 500% वाढ झाली आहे. दरम्यान गेल्या तीन वर्षांच्या काळात या कंपनीचे शेअर्स 670 टक्क्यांनी वाढलेत. ही कंपनी सेक्युरिटीज वर कर्ज देते तसेच कंपनीकडून व्यावसायिक वाहनावर कर्ज सुद्धा ऑफर केले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe