2024 मध्ये ज्या शेअर्सने मालामाल बनवल त्याच शेअर्सने 2025 मध्ये बुडवलं ! ‘या’ 3 शेअर्समध्ये झाली 60 टक्क्यांपर्यंत घसरण

Published on -

Share Market News : स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. खरंतर गेल्यावर्षी अर्थातच 2024 मध्ये स्टॉक मार्केट मधील काही स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा कमवून दिला.

मात्र 2025 मध्ये हे स्टॉक गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय ठरले आहेत. नक्कीच आता तुम्हाला 2024 मध्ये शो टॉपर ठरलेल्या आणि 2025 मध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरलेल्या या स्टॉक्सबाबत माहिती जाणून घेण्याची आतुरता लागली असेल.

चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी डिटेल माहिती. शेअर बाजारात डिसेंबरचा पहिला आठवडा संपताना प्रमुख निर्देशांक आपला सर्वकालीन उच्चांक गाठण्याच्या जवळ पोहोचले आहेत.

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार तेजी आली आहे. पण मार्केटमधील काही मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सने विपरीत दिशेने वाटचाल केली आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना निगेटिव्ह रिटर्न दिले आहेत.

२०२४ मध्ये १००% ते ४००% परतावा देणारे काही शेअर्स २०२५ मध्ये मोठ्या घसरणीत सापडले आहेत. यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. खालील काही प्रमुख शेअर्सची गेल्या वर्षातील आणि चालू वर्षातील कामगिरी लक्षवेधी ठरते.

Insolation Energy : पॉवर आणि रिन्युएबल एनर्जी क्षेत्रातील इन्सोलेशन एनर्जीचा शेअर २०२५ मध्ये ६६% ने खाली आला आहे. गेल्या वर्षी या शेअरने ३९३% प्रचंड वाढ नोंदवली होती. ८० रुपयांच्या खाली असलेला हा शेअर डिसेंबर २०२४ मध्ये ४०० रुपयांहून पुढे गेला होता.

परंतु मागील काही महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांची जोखीम टाळण्याची प्रवृत्ती वाढल्याने आणि उच्च मूल्यांकनामुळे या शेअरमध्ये जोरदार करेक्शन पाहायला मिळत आहे. 

Ashoka Buildcon : पायाभूत सुविधा क्षेत्रातील अशोका बिल्डकॉनचा शेअरही २०२५ मध्ये जवळपास ५०% घसरण झाली आहे. तो ३११ रुपयांवरून १६१ रुपयांपर्यंत खाली आला आहे.

गेल्या वर्षी कंपनीने उत्तम तिमाही परिणाम आणि मजबूत ऑर्डर बुकच्या आधारे १२४% वाढ नोंदवली होती. मात्र या वर्षी प्रकल्पांमधील विलंब, नफा वसुली आणि बाजारातील कमजोरी यांचा दबाव दिसला.

Transformers and Rectifiers (India) : ऊर्जा क्षेत्राशी संबंधित या कंपनीचा शेअर २०२५ मध्ये आतापर्यंत तब्बल ५८% घसरला आहे. वर्षाच्या सुरुवातीला हा शेअर ५७० रुपयांवर होता, मात्र सध्या तो २४० रुपयांच्या खाली ट्रेड होत आहे.

विशेष म्हणजे, २०२४ मध्ये या शेअरने ३९१% वाढ नोंदवली होती. वेगवान वाढीनंतर आलेल्या प्रॉफिट बुकिंगमुळे आणि अस्थिर बाजार वातावरणामुळे यंदाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News