शेअर मार्केटमध्ये जोरदार घसरण ! पण ‘या’ 5 शेअर्सने गुंतवणूकदारांना बनवलं मालामाल, वाचा सविस्तर

Published on -

Share Market News : गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू आहे. मागील वर्षी शेअर बाजारासाठी फारच निराशा जनक राहिले. गेल्या वर्षी अनेक शेअर्सने निगेटिव्ह रिटर्न दिलेत आणि यामुळे गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागला असल्याने आता गुंतवणूकदार फारच सावध पवित्रा घेताना दिसतायेत. पण एकीकडे मार्केटमध्ये जोरदार घसरण सुरू आहे तर या घसरणीच्या काळात सुद्धा

असे काही शेअर्स आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा मिळवून देतायेत. दरम्यान आज आपण अशाच सहा शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत ज्यांनी या चढउताराच्या काळात सुद्धा गुंतवणूकदारांना चांगला नफा दिला आहे.

हे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी ठरलेत जॅकपॉट

वेदांता : या कंपनीचे शेअर्स मार्केटमध्ये जबरदस्त दबाव असताना सुद्धा चांगली कामगिरी करत आहेत. तीस दिवसात या कंपनीचे शेअर्स 24 टक्क्यांपर्यंत वाढलेत. ही नैसर्गिक संसाधनांची कंपनी आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया : चढ उताराच्या काळात काही बँकिंग शेअर्स जोरदार आपटलेत. मात्र असे असतानाही युनियन बँक ऑफ इंडिया आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न देत आहे. मागील 30 दिवसांच्या काळात या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना 18 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळाले आहेत.

हिंदुस्तान झिंक : मागील वर्षात चांदीच्या किमतीने एक नवीन रेकॉर्ड सेट केला आहे. आजही चांदीच्या किमती तेजीत आहेत आणि याचाच फायदा हिंदुस्थानी झिंक या कंपनीला होतोय. वेदांता समूहाच्या या कंपनीने मागील 30 दिवसांच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना 17% इतके रिटर्न दिले आहेत.

Tata Steel : टाटा समूहाच्या या कंपनीत गेल्या 30 दिवसांच्या काळात दमदार तेजी दिसून आली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दहा टक्के एवढे रिटर्न दिले आहेत.

कोल इंडिया : कोळसा उत्पादनाच्या क्षेत्रात सक्रिय असणारी ही सरकारी कंपनी मागील 30 दिवसांच्या काळात गुंतवणूकदारांसाठी फायद्याची ठरली आहे. मागील एका महिन्याच्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 13 टक्के एवढे रिटर्न दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe