गुंतवणूकदार बनलेत मालामाल ! 10 हजाराचे झालेत 3.60 लाख, या शेअर्सने 5 वर्षात गुंतवणूकदारांना बनवले श्रीमंत

Published on -

Share Market News : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक कामाची बातमी आहे. खरं तर गेल्या काय वर्षांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण सतत वाढत आहे.

शेअर मार्केट विश्लेषक गुंतवणूकदारांना नेहमीच लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात आणि लॉन्ग टर्म मध्ये केलेली गुंतवणूक गुंतवणूकदारांना चांगला परतावा सुद्धा मिळवून देत असते.

गेल्या काही वर्षांमध्ये शेअर मार्केटमध्ये सतत चढ-उतार सुरू आहेत मात्र या चढउतारात सुद्धा शेअर मार्केटमध्ये असे काही स्टॉक आहेत जे की आपल्या गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून देतायेत.

दरम्यान आज आपण अशा दोन शेअरची माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा नफा मिळाला आहे.

यातील एका शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे दहा हजार रुपये आज 3.60 लाख रुपये झाले आहेत. नक्कीच आता तुम्हाला या दोन्ही शेअर्स बाबत माहिती जाणून घ्यायची असेल चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी डिटेल माहिती.

हे शेअर्स गुंतवणूकदारांना बनवतायेत मालामाल

पीजी इलेक्ट्रोप्लास्ट : मागील पाच वर्षात या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 36 पट रिटर्न दिले आहेत. उपलब्ध माहितीनुसार या स्टॉकने मागील पाच वर्षांच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना 3,313% रिटर्न दिले आहेत.

अर्थातच यामध्ये ज्या गुंतवणूकदारांनी 5 वर्षांपूर्वी दहा हजार रुपयांची गुंतवणूक केली असेल त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज 3.64 लाख रुपये झाले असेल. ती कंपनी देशातील मोठ्या कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्स ब्रँड्ससाठी कंपोनंट्स बनवते.

म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स तसेच होम अप्लायन्स साठी जे घटक आवश्यक असतात ते घटक या कंपनीकडून बनवले जातात. ही कंपनी टीव्ही, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर तसेच इतर घरगुती उपकरणांसाठी वेगवेगळे कंपोनंट तयार करण्याचे काम करते.

मोठमोठ्या ब्रँड्सला या कंपनीकडून कंपोनंट प्रोव्हाइड केले जात असल्याने मागील पाच वर्षात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले आहेत. 

एचबीएल इंजिनिअरिंग : हा स्टॉक मागील पाच वर्षांच्या काळात एक लाख रुपयांचे 34 लाख रुपये बनवणारा स्टॉक आहे. अर्थात, 2020 मध्ये जर एखाद्या गुंतवणूकदाराने या कंपनीचे एक लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले असते आणि ते शेअर्स आजपर्यंत ओल्ड करून ठेवले असते तर सदर गुंतवणूक आज 34 लाखांची झाली असती.

मागील पाच वर्षांच्या काळात या कंपनीने वार्षिक आधारावर आपल्या गुंतवणूकदारांना 102.9% असे रिटर्न दिले आहेत. म्हणजेच 5 वर्षात दहा हजाराची गुंतवणूक 3.44 लाख रुपयांची झाली.

कंपनीच्या कामकाजाबाबत बोलायचं झालं तर सदर कंपनी बॅटरी आणि पॉवर सोल्यूशन्सच्या माध्यमातून संरक्षण, रेल्वे आणि दूरसंचार क्षेत्रांत कार्यरत आहे. ही कंपनी विविध क्षेत्रांसाठी विशेष बॅटरी, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि रेल्वे सिग्नल्समध्ये लागणारी उपकरणे बनवत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News