गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिलेत Multibagger Return ! शून्य कर्ज असणाऱ्या टॉप 3 कंपन्या 

Published on -

Share Market News : गेल्या काही वर्षांमध्ये शेअर मार्केट तसेच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक वाढली आहे. अनेकांना शेअर मार्केट मधील गुंतवणुकीने चांगला फायदा झाला आहे. पण त्याचवेळी असेही काही लोक आहेत त्यांना शेअर मार्केट मधून मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

खरंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच योग्य शेअर्स निवडून लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी योग्य असणाऱ्या शेअर्समध्येच गुंतवणूकदारांनी इन्वेस्टमेंट करायला हवी असा सल्ला तज्ञ देत असतात.

दरम्यान जर तुम्हाला ही शेअर मार्केट मधील मजबूत फंडामेंटल असणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरे तर गुंतवणूकदार कमी कर्ज किंवा कोणतेही कर्ज नसणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असतात.

यामुळे आज आपण शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असणाऱ्या अशा टॉप 3 कंपन्यांबाबत माहिती पाहणार आहोत ज्या कंपन्यांवर सद्यस्थितीला फारच नगण्य कर्ज आहे. विशेष म्हणजे या कंपन्यांनी गेल्या पाच वर्षांच्या काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा सुद्धा दिलेला आहे. 

हे 3 शेअर्स गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल 

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड – ही संरक्षण क्षत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे. कंपनी जहाज तसेच पाणबुड्या बनवते. या कंपनीचे बाजार भांडवल 1 लाख 16 हजार 246 कोटी इतके आहे. या कंपनीवर फक्त 20.33 कोटी इतके कर्ज आहे. हा स्टॉक सध्या 2881 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. तसेच गेल्या पाच वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 2581% रिटर्न दिले आहेत. 

Bharat Electronics Ltd (BEL) – या कंपनीचे फंडामेंटल सुद्धा फारच मजबूत आहेत. कंपनीचे मार्केट कॅपिटल तीन लाख एक हजार  601 कोटी रुपये आहे. पण या कंपनीवर फक्त 61 कोटी रुपयांचे कर्ज आहे. हा स्टॉक सध्या 412 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. मागील पाच वर्षात स्टॉकने 1181% रिटर्न सुद्धा दिले आहेत. 

हिंदुस्तान एरॉनॉटीक्स – या शेअरची किंमत 4870 रुपये आहे. मागील पाच वर्षात या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 1080% रिटर्न मिळाले आहेत. कंपनीचे मार्केट कॅपिटल तीन लाख 25 हजार 887 कोटी रुपये आहे. तसेच कंपनीवर फक्त 51 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe