Share Market News : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख कंपनी वोडाफोन आयडिया (Vodafone Idea) च्या शेअर्समध्ये येत्या काही दिवसात मोठी वाढ पाहायला मिळू शकते.
खरे तर या कंपनीचे शेअर्स गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढत आहेत. दरम्यान आता जागतिक ब्रोकरेज फर्म Citi सुद्धा या शेअरवर बुलीश आहे. टॉप ब्रोकरेजने या शेअर साठी ‘खरेदी (Buy)’ रेटिंग कायम ठेवली असून, यासाठी टार्गेट प्राईस किंमत 14 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे.

अर्थात हा स्टॉक त्याच्या करंट मार्केट प्राइस पेक्षा जवळपास 50 ते 51 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो असा अंदाज आहे. शुक्रवारी एनएसईवर वोडाफोन आयडियाचा शेअर 9.61 रुपयांवर बंद झाला, जो मागील दिवशीच्या 9.25 च्या तुलनेत 3% पेक्षा जास्त वाढ दर्शवत आहे.
मागील तीन महिन्यांत या शेअरमध्ये 47% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. 8 ऑगस्ट 2025 रोजी शेअरची किंमत 6.51 रुपये होती, तर 7 नोव्हेंबर 2025 रोजी ती 9.61 वर पोहोचली.
महत्वाची बाब म्हणजे या कंपनीच्या शेअर्सने गेल्या सहा महिन्यांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 39% रिटर्न दिले आहेत आणि या वर्षात आत्तापर्यंत हा स्टॉक 20 टक्क्यांनी वाढला आहे. या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 10.57 आणि नीचांक 6.12 रुपये राहिला आहे.
Citi ने स्पष्ट केलं आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशानंतरही त्यांनी या शेअरवर ‘Buy’ रेटिंग कायम ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने वोडाफोन आयडियाला आपल्या थकीत AGR (Adjusted Gross Revenue) रकमेचे पुनर्मूल्यांकन करण्यास परवानगी दिली आहे.
कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मार्च 2025 पर्यंत वोडाफोन आयडियाचे एकूण AGR दायित्व 83,500 कोटींहून अधिक आहे, ज्यात सुमारे 9,450 कोटींच्या अतिरिक्त थकबाकीचा समावेश आहे.
तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे कंपनीच्या आर्थिक दडपणात काही प्रमाणात सवलत मिळू शकते. तसेच, भविष्यातील 5G गुंतवणूक आणि ग्राहक बेस वाढीमुळे वोडाफोन आयडियाच्या व्यवसायाला बळकटी मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे, अल्पकालीन चढ-उतार असूनही, या शेअरमध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी वाढीची चांगली संधी असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.













