Share Market News : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी एक खुशखबर आहे. पाच वर्षात 900% रिटर्न देणाऱ्या एका कंपनीने आपल्या शेअर होल्डर्स ला डिव्हीडंड देण्याची घोषणा केली आहे. जे गुंतवणूकदार डिव्हीडंट देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छित असतील त्यांच्यासाठी नक्कीच ही एक मोठी संधी ठरणार आहे.
खरे तर सध्या शेअर मार्केट मधील लिस्टेड कंपन्या आपले सप्टेंबर तिमाहि निकाल जाहीर करत आहेत. सोबतच गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर्स, Dividend अशा कॉर्पोरेट लाभाची देखील घोषणा केली जात आहे. शेअर इंडिया सिक्युरिटीज या कंपनीने देखील आपल्या शेअर होल्डर साठी लाभांश देण्याची घोषणा केली आहे.

कंपनीने तिमाही निकाल जाहीर करतानाच ही घोषणा केली असून यामुळे कंपनीचे स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आले आहेत. Share India Securities ने 30 ऑक्टोबर 2025 रोजी जुलै-सप्टेंबर तिमाहीचे निकाल, दुसरा अंतरिम लाभांश आणि नवीन कंपनीतील हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली आहे.
किती मिळणार लाभांश
कंपनीच्या संचालक मंडळाने 30 ऑक्टोबर रोजी स्टॉक एक्सचेंज ला दिलेल्या माहितीनुसार कंपनीकडून आपल्या शेअर होल्डर्सला 0.40 रुपयांचा लाभांश दिला जाणार आहे. अर्थात कंपनीकडून प्रत्येक पात्र शेअर होल्डर्सला प्रति शेअर 0.40 रुपयांचा लाभांश मिळणार आहे.
रेकॉर्ड डेट पर्यंत ज्या शेअर होल्डर्सकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. पण अद्याप कंपनीने लाभांश साठीची रेकॉर्ड डेट निश्चित केलेली नाही. मात्र कंपनीच्या संचालक मंडळाकडून लवकरच या संदर्भातील निर्णय होणे अपेक्षित आहे.
कंपनीने यावेळी शेअर इंडिया ग्रेहिल प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक नवीन उपकंपनी स्थापन करण्याची आणि त्यात 6 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणाही केली आहे. महत्वाची बाब म्हणजे कंपनी ही गुंतवणूक एक किंवा अधिक हप्त्यांमध्ये करणार आहे.
दरम्यान कंपनीच्या संचालक मंडळाने केलेल्या या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 0.76 टक्क्यांची वाढ झाली आहे. काल हा स्टॉक 199.60 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत होता. पण आज याची किंमत 186 रुपयांपर्यंत घसरली. दरम्यान गेल्या पाच वर्षांच्या काळात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 912% रिटर्न दिले आहेत.
पण मागील एका वर्षाच्या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये 31 टक्क्यांची घसरण झाली आहे. या वर्षात आतापर्यंत 33 टक्क्यांची घसरण झाली आहे. मात्र गेल्या 30 दिवसांच्या काळात कंपनीचे स्टॉक 55 टक्क्यांनी वाढले आहेत.













