गुंतवणूकदारांना कमाईचे मोठी संधी ! शेअर मार्केट मधील ‘ही’ कंपनी एकाच वेळी देणार डबल गिफ्ट, बोनस शेअर्स अन स्टॉक स्प्लिटची घोषणा

Published on -

Share Market News : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी बोनस शेअर्स, Dividend तसेच स्टॉक स्प्लिट करणाऱ्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अधिक खास ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शेअर मार्केटमधील कंपनीने एकाच वेळी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे आणि यामुळे गेल्या एका वर्षभरापासून दबावात असणारे शेअर्स आता तेजीत आले आहेत.

बेस्ट अ‍ॅग्रोलाइफ लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांसाठी स्टॉक स्प्लिट म्हणजेच शेअर्सचे विभाजन करण्याची आणि बोनस शेअर्स देण्याची तयारी पूर्ण केली आहे. या प्रस्तावाला कंपनीच्या संचालक मंडळाकडून नुकतीच मान्यता देण्यात आली असून यामुळे या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत.

मागील बारा महिन्यांपासून या कंपनीचे स्टॉक दबावत होते मात्र आता पुन्हा एकदा याचे स्टॉक तेजीत आले आहेत आणि म्हणूनच गुंतवणूकदारांचे लक्ष या स्टॉक कडे वेधले गेले आहेत.

Best Agrolife ही देशातील आघाडीचे ऍग्रो केमिकल कंपनी म्हणून ओळखली जाते. ही कंपनी 1992 पासून व्यवसाय करत आहे. दरम्यान आता या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी शेअर स्प्लिट आणि बोनस इश्यू जाहीर केले आहे.

कंपनीने 1:10 च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कंपनी दोन शेअर्स मागे 7 शेअर्स फ्री मध्ये देणार आहे. म्हणजे कंपनीकडून 2:7 च्या प्रमाणात बोनस शेअरचे वितरण केले जाणार आहे.

छोट्या गुंतवणूकदारांना मिळणार दिलासा 

कंपनी एका शेअरचे दहा शेअर्समध्ये विभाजन करणार आहे. स्प्लिटनंतर शेअरची संख्या वाढेल आणि किंमत तुलनेने कमी होईल, ज्यामुळे नवीन गुंतवणूकदारांसाठी हा शेअर अधिक परवडणारा ठरणार अशी माहिती जाणकारांकडून देण्यात आली आहे.

याचबरोबर कंपनीने 2 शेअर्समागे 7 बोनस शेअर्स देण्याचीही घोषणा केली आहे. या दुहेरी घोषणेमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह वाढला असून शेअरमध्ये खरेदीची लाट पाहायला मिळत आहे.

शेअरची स्टॉक मार्केट मधील कामगिरी 

कंपनीच्या संचालक मंडळाने घेतलेल्या या निर्णयानंतर Best Agrolife च्या शेअरने गेल्या काही सत्रांत जबरदस्त उसळी घेतली आहे. यामुळे शेअर्सची किंमत 391.50 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या शेअरची गेल्या दहा दिवसांमधील कामगिरी फारच उत्साहवर्धक राहिली आहे.

गेल्या दहा दिवसात कंपनीचे शेअर्स 300 रुपयांवरून 385 रुपयांवर पोहोचले आहेत. कंपनीचे मार्केट कॅपिटल देखील 946.14 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. पण मागील तीन वर्षात या कंपनीच्या स्टॉक मध्ये 76% ची घसरण झाली आहे. तसेच मागील एका वर्षात शेअर्स मध्ये 40 टक्क्यांची घसरण झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News