Share Market News : शेअर मार्केटच्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गुंतवणूकदारांसाठी पुन्हा एकदा कमाईचे सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केट मधील अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स आणि लाभांश देण्याची मोठी घोषणा केली आहे.
आता पुन्हा एकदा शेअर मार्केटच्या एका बड्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर्स वाटपाची घोषणा केली असून यामुळे पुन्हा एकदा या कंपनीचे शेअर्स फोकस मध्ये आले आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना डबल बोनस देणार आहे म्हणजेच बोनस शेअर्स आणि लाभांश सुद्धा वितरित करणार आहे.
खरे तर शेअर मार्केट मधील अनेक गुंतवणूकदार बोनस शेअर्स आणि लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्वेस्ट करण्यासाठी उत्सुक असतात दरम्यान जर तुम्ही पण शेअर मार्केट मधील अशाच कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा असाल तर तुमच्यासाठी नक्कीच ही एक मोठी संधी ठरणार आहे आणि यामुळे तुम्हाला या कंपनीमधून चांगली कमाई होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी रेकॉर्ड डेट सुद्धा फायनल करण्यात आली आहे.
कोणती आहे ही कंपनी
डायग्नोस्टिक सेवा पुरवणाऱ्या आघाडीच्या थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीने आपल्या भागधारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने पहिल्यांदाच बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला असून शेअरधारकांना त्यांच्या मालकीच्या प्रत्येक एक शेअरसाठी दोन बोनस शेअर्स मोफत मिळणार आहेत.
या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे. कंपनीने बोनस इश्यूसोबतच प्रति शेअर ७ रुपयांचा लाभांशही जाहीर केला आहे, त्यामुळे भागधारकांना दुहेरी लाभ मिळणार आहे.
थायरोकेअर टेक्नॉलॉजीजने दिलेल्या माहितीनुसार, बोनस शेअर्ससाठी २८ नोव्हेंबर २०२५ ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. या दिवशी ज्यांच्या डिमॅट खात्यात कंपनीचे शेअर्स असतील, त्यांनाच बोनस शेअर्स मिळणार आहेत.
कंपनीने बोनस शेअर्स वाटपाची तारीख १ डिसेंबर २०२५ निश्चित केली आहे. तर या बोनस शेअर्सचे ट्रेडिंग २ डिसेंबर २०२५ पासून भारतीय शेअर बाजारात सुरू होणार आहे. कंपनीने ऑक्टोबर महिन्यात बोनस इश्यूची घोषणा केली होती.
या बोनस इश्यूमुळे शेअर्सची लिक्विडिटी वाढण्यास मदत होईल, तसेच गुंतवणूकदारांमध्ये कंपनीविषयीचा विश्वास आणखी दृढ होईल, असे बाजार विश्लेषकांचे मत आहे.
शिवाय, २०१६ पासून आजपर्यंत कंपनीने एकूण १४३.५ रुपये प्रति शेअर इतका लाभांश दिला असून गुंतवणूकदारांना सातत्याने परतावा देण्याची कंपनीची परंपरा कायम आहे.
लाभांश आणि बोनस शेअर्स या दोन्ही घोषणांमुळे कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा गुंतवणूकदारांच्या चर्चेत आले आहेत. आगामी काळात कंपनीचा व्यवसाय विस्तार, तंत्रज्ञानातील गुंतवणूक आणि वाढती टेस्टिंगची मागणी या गोष्टींचा लाभ थायरोकेअरला मिळू शकतो.
त्यामुळे कंपनीच्या दीर्घकालीन दृष्टिकोनातून हा निर्णय अत्यंत सकारात्मक मानला जात आहे. थायरोकेअरच्या या घोषणेमुळे आता गुंतवणूकदारांचे या शेअर्सकडे लक्ष वेधले गेले आहे. त्यामुळे येत्या काळात या शेअरच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.













