Share Market News : बोनस शेअर्स आणि डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यांकडे लक्ष ठेवून असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांना पुन्हा एक कमाईची संधी चालून आली आहे. एका दिग्गज कंपनीने 91व्या वेळा लाभांश देण्याची मोठी घोषणा केली असून यामुळे कंपनीचे स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आले आहेत.
एचसीएल टेक्नॉलॉजीजने आपल्या शेअर होल्डर्सला पुन्हा एकदा डिवीडेंट देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेअर होल्डर्समध्ये उत्साहाचे वातावरण आहे. खरे तर शेअर मार्केट मधील कंपन्या आता आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत.

एचसीएल टेक्नॉलॉजीजने सुद्धा सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. यात कंपनीला 4235 कोटी एकात्मिक निव्वळ नफा मिळाला आहे. जून तिमाहीपेक्षा सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीला अधिक नफा मिळाला आहे. यावेळी कंपनीचा नफा 10.2 टक्क्यांनी वाढला आहे.
दरम्यान आता कंपनीकडून डिविडेंट देण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. सोमवारी कंपनीच्या संचालक मंडळाने प्रतिशर 12 रुपयाचा अंतरीम लाभांश देण्याचा निर्णय घेतला असून आतापर्यंत कंपनीने 90 वेळा लाभांश दिलेले आहेत. म्हणजेच आता 91 व्या वेळा कंपनी आपल्या शेअर होल्डर्सला डिव्हीडंटचा लाभ देणार आहे.
यासंदर्भात कंपनीच्या संचालक मंडळाकडून स्टॉक एक्सचेंजला डिटेल माहिती देण्यात आली आहे. सप्टेंबर तिमाहीत त्यांचे एकत्रित उत्पन्न वार्षिक आधारावर 10.6 टक्क्यांनी वाढून 31,942 कोटी रुपये झाले आहे. कंपनीने वार्षिक तीन ते पाच टक्के महसूल वाढीचा अंदाज सुद्धा यावेळी कायम ठेवला आहे.
मात्र कंपनीची गेल्या काही महिन्यांमधील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. गत पाच वर्षात या कंपनीच्या शेअर्स मधून 80 टक्के परतावा मिळाला आहे. पण गेल्या बारा महिन्यांमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांनी तसेच या वर्षात आत्तापर्यंत 21 टक्क्यांनी घसरले आहे.
गेल्या सहा महिन्यात कंपनीच्या शेअर्स फक्त पाच टक्क्यांनी वाढले आहे. तसेच मागील पाच दिवसांमध्ये कंपनीचे स्टॉक 5% वाढले आहे. पण आज या शेअर्समध्ये थोडीशी घसरण झाली.
सध्या या कंपनीचे स्टॉक 1494 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करताना दिसत आहेत. कंपनीने लाभांश देण्याची घोषणा केली असली तरी देखील याची रेकॉर्ड डेट अजून निश्चित झालेली नाही. पण लवकरच याबाबतही अंतिम निर्णय होऊ शकतो.