शेअर मार्केट गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्णसंधी ; ‘ही’ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी देणार एका शेअरवर 4 मोफत शेअर्स

Published on -

Share Market News : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कमाईचे सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. खरे तर सर्वसामान्य गुंतवणूकदार बोनस शेअर्स वितरित करणाऱ्या कंपन्यांकडे लक्ष ठेवून असतात.

अनेकजण अशा कंपन्यांमध्ये इन्वेस्ट करण्यासाठी उत्सुक असतात. दरम्यान तुम्हीही तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये बोनस शेअर्स वितरित करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स ॲड करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत शेअर्स वितरित करण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीकडून रेकॉर्ड तारीख पण ठरवण्यात आली आहे.

ह्या कंपनीने 4:1 या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली असून यामुळे कंपनीचे स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आले आहेत. खरे तर ही एक एनबीएफसी अर्थात नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनी आहे. दरम्यान आज आपण या कंपनीच्या बोनस शेअर्सच्या वितरणाबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

 बोनस शेअर्स इशूची रेकॉर्ड तारीख 

 नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनी ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर चार फ्री शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी 13 जानेवारी 2026 ही रेकॉर्ड तारीख सेट करण्यात आली आहे. अर्थात या तारखेपर्यंत संबंधित कंपन्यांचे शेअर्स ज्या गुंतवणूकदारांकडे असतील त्यांनाच या मोफत शेअरचा लाभ मिळणार आहे.

जर समजा तुमच्याकडे या कंपनीचे शेअर्स नसतील पण तुम्हाला या बोनस शेअर चा लाभ घ्यायचा असेल तर 12 जानेवारीपर्यंत तुम्ही हे शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये जोडणे आवश्यक आहे.

कंपनीच्या या निर्णयानंतर शेअर्समधील तरलता वाढणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांकडे असणाऱ्या शेअरची संख्या पाच पटीने वाढेल. बोनस शेअरचे वितरण झाल्यानंतर गुंतवणूकदाराकडील एका शेअरचे रूपांतरण पाच शेअर्स मध्ये होईल.

या बोनस शेअर्सच्या वितरणामुळे कंपनीच्या शेअरच्या संख्येवर परिणाम होईल. कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या 16.98 कोटींवरून वाढून सुमारे 84.92 कोटींवर पोहोचणार अशी माहिती तज्ञांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान बोनस शेअर्स गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात 14 जानेवारीपर्यंत वर्ग केले जातील अशी पण माहिती समोर येत आहे. सध्या या कंपनीचे स्टॉक 3,045 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करत आहेत.

मागील पाच वर्षात या कंपनीने 17,380% इतके रिटर्न दिलेले आहेत. मात्र मागील सहा महिन्यात या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना फक्त 13% रिटर्न मिळाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News