Share Market News : बोनस शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आयटी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे.
कारण की शेअर मार्केट मधील एका मोठ्या आयटी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर्स वितरित करण्याची मोठी घोषणा केली आहे. माहिती तंत्रज्ञान (IT) आणि सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या Sylph Technologies Ltd आपल्या गुंतवणूकदारांना वेळोवेळी बोनस शेअर्स वितरित करीत आहे.

या आर्थिक वर्षात सुद्धा कंपनीकडून बोनस शेअर्स वाटपाची मोठी घोषणा करण्यात आली आहे. या आर्थिक वर्षात पहिल्यांदाच कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार असून यामुळे या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत.
कंपनी किती बोनस शेअर्स देणार?
कंपनीच्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार आता या कंपनीच्या गुंतवणूकदारांना पाच बोनस शेअर्स मिळणार आहेत. कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणूकदारांना 5:11 च्या प्रमाणात बोनस शेअरचे वितरण करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
अर्थातच कंपनीकडून 11 शेअर्ससाठी एक रुपया फेस व्हॅल्यू असणारे पाच बोनस शेअर्स दिले जाणार आहेत. कंपनी 1 रुपया दर्शनी मूल्याचे 5 नवीन पूर्ण-पेड-अप इक्विटी शेअर्स गुंतवणूकदारांना फ्री मध्ये देणार आहे.
हे बोनस स्टॉक प्रामुख्याने कंपनीच्या सिक्युरिटीज प्रीमियम खात्यातील रकमेतून वितरित होतील अशी पण माहिती संचालक मंडळाकडून प्राप्त झाली आहे.
रेकॉर्ड रेट काय आहे?
कंपनीच्या संचालक मंडळाने 28 नोव्हेंबर 2025 रोजी आपल्या बोर्ड मीटिंगमध्ये गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यासाठी कंपनीने 17 डिसेंबर 2025 ही रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे.
विशेष म्हणजे मंजुरीच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत गुंतवणूकदारांना बोनस शेअरचा लाभ मिळणार अशी सुद्धा माहिती समोर येत आहे.
दोन महिन्यांच्या आत म्हणजेच 28 जानेवारी 2026 च्या आत बोनस शेअर्स खातेदारांच्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा करण्यात येणार आहेत. नक्कीच बोनस शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे.
आता तुम्हाला पण बोनस शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी पण ही एक मोठी सुवर्णसंधी राहणार आहे मात्र याकरिता तुम्हाला 17 डिसेंबरच्या आत या कंपनीचे शेअर्स खरेदी करावे लागणार आहेत.
या शेअरच्या कामगिरी बाबत बोलायचं झालं तर मागील पाच वर्षांच्या काळात स्टॉक ची किंमत 160 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र मागील एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 32 टक्क्यांची घसरण झाली आहे. काल या कंपनीचा स्टॉक 0.88 रुपयांवर व्यवहार करत होता.













