मोठी बातमी ! आता ‘या’ बड्या कंपनीचे डीमर्जर होणार, गुंतवणूकदारांना मिळणार इतके मोफत शेअर्स, रेकॉर्ड डेट आत्ताच नोट करून घ्या

Published on -

Share Market : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी बोनस शेअर्स, डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की आता शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असणाऱ्या एका बड्या कंपनीने डीमर्जनची मोठी घोषणा केली असून ट्रिमर जर झाल्यानंतर या कंपनीच्या शेअर होल्डर्सला मोफत शेअर सुद्धा मिळणार आहेत.

खरे तर अलीकडेच टाटा कंपनीने असे डिमर्जर जाहीर केले होते. आता अशाच प्रकारचे डीमर्जर ऑटो कंपोनेंट कंपनी एसकेएफ इंडियाने सुद्धा जाहीर केले आहे. दरम्यान डीमर्जरचा निर्णय झाल्यापासून या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत. खरे तर या कंपनीने आपल्या औद्योगिक व्यवसायाचे विलगीकरण करण्याचा म्हणजेच डीमर्जर करण्याचा निर्णय घेतला आहे.

थोडक्यात कंपनी आपला औद्योगिक व्यवसाय वेगळा करणार आहे. कंपनीचा औद्योगिक व्यवसाय आता एका नव्या कंपनीच्या माध्यमातून होणार आहे. या नव्या कंपनीचे नाव एसकेएफ इंडिया इंडस्ट्रियल लिमिटेड असे निश्चित करण्यात आले आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार हे डीमर्जर एक ऑक्टोबर पासून लागू करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधीकरण मुंबई खंडपीठाने या योजनेला मान्यता सुद्धा दिलेली आहे. दरम्यान कंपनीने स्टॉक एक्सचेंज ला दिलेल्या आणखी एका फायलींग मध्ये डीमर्जर ची रेकॉर्ड सुद्धा निश्चित करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.

कंपनीने स्टॉक एक्सचेंज ला सांगितल्याप्रमाणे विलगीकरणासाठी रेकॉर्ड तारीख 15 ऑक्टोबर फिक्स करण्यात आली आहे. डीमर्जर झाल्यानंतर कंपनीच्या शेअर होल्डर्स ला नव्या कंपनीचे सुद्धा शेअर्स मिळणार आहेत. 15 तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये SKF इंडियाचे शेअर्स असतील त्यांना नव्या कंपनीचे सुद्धा शेअर्स मिळणार आहेत.

शेअर होल्डर्स ला जुन्या कंपनीचे जेवढे शेअर्स असतील तेवढेच शेअर्स नव्या कंपनीचे दिले जाणार आहेत. अर्थात 1:1 या प्रमाणात बोनस शेअरचे वाटप होणार आहे. विलगीकरण योजनेअंतर्गत एसकेएफ इंडियाच्या प्रत्येक शेअरहोल्डरला त्यांच्या प्रत्येक शेअरसाठी एसकेएफ इंडिया इंडस्ट्रियलचा एक शेअर मिळणार अशी माहिती कंपनीने दिली आहे.

दरम्यान विलगीकरण पूर्ण झाल्यानंतर नव्या कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर सूचीबद्ध होणार आहेत. कंपनीने रेकॉर्ड तारीख उलटली की लिस्टिंगची तारीख सुद्धा जाहीर करण्यात येईल असे म्हटले आहे. कंपनीला आशा आहे की नोव्हेंबर पर्यंत नव्या कंपनीचे शेअर्स लिस्ट होतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News