Share Market:- जागतिक पातळीवर सध्या मोठ्या प्रमाणावर भू-राजकीय तणाव दिसून येत असल्याने त्याचा परिणाम हा शेअर बाजारावर दिसून येत आहे व देशातील शेअर बाजार जर बघितला तर त्यामध्ये एका वर्षापासून खूप मोठी अस्थिरतेची परिस्थिती आहे. अमेरिकेचे टॅरिफ धोरण तसेच परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर केलेली विक्री अशा प्रकारच्या इतर अनेक कारणांमुळे देखील शेअर बाजारामध्येही अस्थिरता दिसून येत आहे. या कालावधीत नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात एनएसई 500 निर्देशांकातील एकूण पाचशे शेअर्स पैकी तब्बल 327 शेअर्स घसरल्याचे दिसून आले व गुंतवणूकदारांना नकारात्मक परतावा दिला. यामध्ये काही शेअर्स असे आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांच्या पैशांचे तब्बल 50 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान केले आहे. चला तर मग अशा प्रकारचे शेअर्स नेमके कोणते आहेत? याची माहिती बघू.
या शेअर्सने गुंतवणूकदारांचे पैसे केले मातीमोल
1- अदानी ग्रीन एनर्जी- अदानी समूहातील ही एक महत्त्वाची कंपनी आहे. परंतु या कंपनीने मात्र गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांचे 50 टक्के पेक्षा जास्त भांडवलाचे नुकसान केलेले आहे. आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्समध्ये दहा टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे.

2- रेमंड लाईफस्टाईल- ही कंपनी साधारणपणे सप्टेंबर 2024 मध्ये मार्केटमध्ये लिस्टेड झाली. या कंपनीने देखील गुंतवणूकदारांना अपेक्षित परतावा दिला नसून मार्केटमध्ये लिस्ट झाल्यानंतर एका वर्षाच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरच्या किमतीमध्ये तब्बल 50% पर्यंत घसरण दिसून आली आहे.
3- एचएफसीएल लिमिटेड- या कंपनीचे मुख्यालय दिल्लीला असून या कंपनीने देखील गुंतवणूकदारांचे नुकसानच केलेले आहे. गेल्या एक वर्षापासून या कंपनीचे शेअर्स 54% घसरले आहेत व 2025 मध्ये आतापर्यंत 38 टक्क्यांची घसरण यामध्ये दिसून येत आहे.
4- तेजस नेटवर्क- 2025 मध्ये जर बघितले तर आतापर्यंतच्या कालावधीत या शेअर्समध्ये 50 टक्क्यांची घसरण झालेली आहे व गेल्या एक वर्षात तेजस नेटवर्क शेअर्स 55% पेक्षा जास्त घसरल्याचे चित्र आहे. या कंपनीची आर्थिक स्थिती बघितली तर जून तिमाहीमध्ये या कंपनीच्या निव्वळ विक्रीमध्ये 87% ची घट झाली आहे व याच कालावधीत 193.87 कोटी रुपयांचा तोटा देखील झाला आहे.