‘हे’ 5 शेअर्स गुंतवणूकदारांवर पाडणार पैशांचा पाऊस ! मोतीलाल ओसवाल यांनी सुचवलेले शेअर्स देणार जबराट परतावा

Published on -

Share Market Tips : दिवाळीत अनेकांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली असेल. तर काही लोक आता शेअर मार्केटमध्ये सप्टेंबर तिमाही निकालानंतर गुंतवणूक करण्यास उत्सुक असतील. खरे तर गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केट मधील लिस्टेड कंपनी सप्टेंबर तिमाहि निकाल जाहीर करत आहेत.

सोबतच काही कंपन्यांकडून आपल्या शेअर होल्डर्सला आकर्षित करण्यासाठी बोनस शेअर्स आणि लाभांश देण्याची सुद्धा घोषणा केली जात आहे. दरम्यान तिमाही निकालाच्या आधारावर उत्कृष्ट रिटर्न देण्याची क्षमता ठेवणारा शेअर्समध्ये ज्यांना गुंतवणूक करण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी आजचा हा लेख कामाचा राहणार आहे.

आज आपण येत्या काळात 34 टक्क्यांपर्यंत रिटर्न देण्याची क्षमता ठेवणाऱ्या टॉप पाच शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत. महत्त्वाची बाब म्हणजे आज आम्ही तुम्हाला ज्या शेअर्स विषयी सांगणार आहोत ते सर्व शेअर्स मोतीलाल ओसवाल यांनी सुचवलेले आहेत.

त्यामुळे जर तुम्ही ही चांगल्या स्ट्रॉंग फंडामेंटल असणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्वेस्ट करण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही या पाच पैकी कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता आणि येत्या काळात तुम्हालाही चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.

 हे शेअर्स गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त रिटर्न

Nippon Life India Asset Management  – येत्या काळात शेअर मार्केटमधून चांगले रिटर्न मिळवायचे असतील तर तुमच्यासाठी या कंपनीचे शेअर्स फायद्याचे ठरू शकतात. या शेअर साठी मोतीलाल ओसवाल यांनी 1 हजार 60 रुपयांची टार्गेट प्राईस सेट केली आहे. अर्थात गुंतवणूकदारांना यातून 21 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात.

आयटीसी – दिग्गज एफएमसीजी कंपनी आयटीसी आपल्या गुंतवणूकदारांना येत्या काही महिन्यांमध्ये चांगले रिटर्न देण्याची क्षमता ठेवते. या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास येत्या काळात 23 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात. या कंपनीच्या शेअर्ससाठी 515 रुपयांचे टारगेट प्राईस सेट करण्यात आले आहे. या स्टॉक साठी मोतीलाल ओसवाल यांनी बाय रेटिंग दिली आहे.

स्विगी – कमी दिवसात जास्त रिटर्न हवे असतील तर तुमच्यासाठी स्विगीचा स्टॉक फायद्याचा ठरू शकतो. येत्या काही महिन्यांनी तुम्हाला या स्टॉक मधून 34 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात. मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज फर्मने या स्टॉक साठी 550 रुपयांची टारगेट प्राईस ठेवलेली आहे.

Canara बँक – कॅनरा बँकेचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना येत्या काही महिन्यांनी 12 टक्क्यांपर्यंत रिटर्न देण्याची क्षमता ठेवतात. या शेअर साठी 153 रुपयांची टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे.

Hyundai Motor India – या स्टॉक साठी 2801 रुपयांची टारगेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. अर्थात आगामी काळात या स्टॉकमधून गुंतवणूकदारांना 15 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात असा ब्रोकरेजचा अंदाज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe